शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट श्वानांचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:02 IST

शहरात नागरिकांना ठेवा किंवा श्वानांना, असे म्हणायची वेळ आली आहे. येत्या आठ दिवसांत मनपा प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून निर्णय घ्यावा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज सर्वसाधारण सभेत प्रशासनाला दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील मोकाट श्वान नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. माणसांच्या जिवापेक्षा काहीच मोठे नाही. कडक नियम बाजूला ठेवून मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावाच लागेल. शहरात नागरिकांना ठेवा किंवा श्वानांना, असे म्हणायची वेळ आली आहे. येत्या आठ दिवसांत मनपा प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून निर्णय घ्यावा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज सर्वसाधारण सभेत प्रशासनाला दिले.सोमवारी सकाळी ११.३० वाजता नियमित सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच नगरसेवकांनी मोकाट श्वानांचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहातील सर्वच पक्षांतील नगरसेवकांनी मिळून प्रशासनावर हल्लाबोल केला. किराडपुरा भागातील रहेमानिया कॉलनीत एकाच रात्री तब्बल १८ मुलांचे लचके मोकाट श्वानांनी तोडले होते.शहरातील विविध वसाहतींमध्ये आजही श्वान चावण्याचे प्रकार सुरूच आहेत. नारेगाव भागातील कोणत्याही रस्त्यावर रात्री ११ नंतर दुचाकी चालवून दाखवावी त्याला ५० हजारांचे बक्षीस देतो असे नगरसेवक राजू शिंदे यांनी सांगून विषयाचे गांभीर्य नमूद केले. कालपर्यंत औरंगाबादकर श्वानांचा त्रास सहन करीत होते. आता वराहांचीही संख्या चारपटीने वाढली आहे.मोहम्मद इर्शाद यांनी आपल्या वॉर्डातील पिसाळलेल्या श्वानाच्या हल्ल्यानंतरचा तपशील नमूद केला. ज्या मुलांवर हल्ले झाले त्यांचे काय हाल सुरू आहेत, त्यावर सविस्तर प्रकाश टाकला. अज्जू पहेलवान यांनी अर्थसंकल्पात श्वानांवर होणा-या खर्चाची तरतूद करावी, असा सल्ला दिला. अर्चना नीळकंठ, समीना शेख, बन्सी मामा, ज्योती पिंजरकर यांनीही सभागृहातील चर्चेत भाग घेतला. सभागृहनेता विकास जैन यांनी कायम बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.