शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये प्रवास करताना रोकड, दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:12 IST

बसमधून प्रवास करताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन व रोकड असा एकूण ५४ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बसमधून प्रवास करताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन व रोकड असा एकूण ५४ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औंढा नागनाथ येथून पुसद-परभणी बस क्रमांक एमएच-४०-एन- ९३७० मधून परभणी जिल्ह्यातील साळेगाव येथील आशामती मधुसूदन साळेगावकर प्रवास करीत होत्या. बस जवळा बाजार परिसरात येताच त्यांच्या गळ्यातील व पर्समधील कोणीतरी हातचलाखीने रोकड व सोन्याचे दागिने चोरले. काही वेळातच चोरट्यांनी डाव साधल्याचे आशामती सोडेगावकर यांच्या लक्षात आले. त्यांनी थेट ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली. यावेळी बस ठाण्यात आणून तपासणी पोलिसांनी केली. परंतु चोरट्याचा शोध लागला नाही. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी सपोनि सुनील नाईक, राठोड, इम्रान सिद्दीकी, गणेश लेकुळे यांच्यासह ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी बसची तपासणी केली. बसमधील चोरट्याचा शोध लागला नसून पोलीस तपास करीत आहेत.गेल्या काही दिवसांपासून औंढा येथून प्रवासात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. काही महिलांना यापूर्वीही अशी चोरी करताना पकडले होते.