शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केशव कुलकर्णी यांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करण्याची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:18 IST

केशव कुलकर्णी यांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदविण्याबाबत सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करता येत असल्यामुळे तेथे जाणे योग्य राहील, असे मत व्यक्त करीत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे यांनी याचिकाकर्त्याला सत्र न्यायालयात जाण्याची मुभा दिली.

ठळक मुद्दे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या विनंतीच्या अनुषंगाने आदेश

औरंगाबाद : केशव कुलकर्णी यांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदविण्याबाबत सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करता येत असल्यामुळे तेथे जाणे योग्य राहील, असे मत व्यक्त करीत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे यांनी याचिकाकर्त्याला सत्र न्यायालयात जाण्याची मुभा दिली.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांच्यासह इतर तिघांविरुद्ध कुलकर्णी यांचा संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी विनंती करणाऱ्या अर्जाच्या अनुषंगाने राहाता येथील न्यायालयात नोंदविण्यात आलेल्या दोन साक्षीदारांच्या साक्षी पुन्हा नोंदविण्याची विनंती करणारा अर्ज फेटाळण्यात आला होता. या आदेशाविरुद्ध दाखल याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.यासंदर्भात मूळ तक्रारदार बापू दिघे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार केशव कुलकर्णी हे प्रवरा कारखान्याचे कर्मचारी होते. त्यांना ७ एप्रिल २०१२ रोजी कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर बोलावले होते. त्यावेळी तेथे माजी मंत्री बाळासाहेब विखे आणि त्यांची दोन मुले राधाकृष्ण आणि राजेंद्र, तसेच त्यांचे बॉडीगार्ड नेहे आणि डुकरे होते. दुसºया दिवशी कुलकर्णी यांचा मृतदेह कॅनॉलमध्ये आढळला होता. त्यानंतर पाच ते सहा महिन्यांनी विखे पाटील यांनी कुलकर्णी यांची शेतजमीन विकत घेतली होती.दिघे यांनी तहसीलदारांकडे कुलकर्णी यांच्या आकस्मिक मृत्यूबाबतची माहिती मागीतली. ती देण्यास त्यांनी आधी होकार देऊन नंतर माहिती दिली नाही. कुलकर्णी यांचे शवविच्छेदन प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात झाले होते. या संशयास्पद घटनांमुळे दिघे यांनी २०१६ साली राहाता येथील न्यायालयात खाजगी तक्रार दाखल करून फौजदारी प्रक्रियेच्या कलम १५६(३) नुसार राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील यांच्यासह इतर तिघांविरुद्ध कुलकर्णी यांचा संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी विनंती केली होती. मात्र, सदर घटनेला चार वर्षे झाली असल्याने वरील आरोपांबाबत पुरावे देण्याचे न्यायालयाने सूचित केले. या अर्जाच्या अनुषंगाने वाहनचालक राजू इनामदार आणि ग्रामविकास अधिकारी कविता आहेर यांच्या साक्षी नोंदविताना टंकलेखकाने चुका केल्या आहेत. त्यांच्या साक्षी पुन्हा नोंदविण्याची विनंती करणारा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्याविरुद्ध दिघे यांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर आणि अजिंक्य काळे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयAhmednagarअहमदनगर