शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

‘वृथा सीण’ आहे संमेलनाचा!

By admin | Updated: December 21, 2014 00:18 IST

राजकारण्यांमधील साहित्यिक अशीही एक चर्चा यानिमित्ताने होऊ शकेल. मात्र, याच्याच विरुद्ध ‘साहित्यिकांमधील राजकारणी’ हासुद्धा गंभीर परिसंवादाचा विषय बनू शकतो.

राजकारण्यांमधील साहित्यिक अशीही एक चर्चा यानिमित्ताने होऊ शकेल. मात्र, याच्याच विरुद्ध ‘साहित्यिकांमधील राजकारणी’ हासुद्धा गंभीर परिसंवादाचा विषय बनू शकतो. असो. यावर्षी नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेले ३६ वे मराठवाडा साहित्य संमेलन विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे डिसेंबरमध्ये घेण्याचे ठरले. त्यानंतर डिसेंबर उजाडला तरी कार्यक्रमपत्रिकाही मूर्तरूपात आली नसल्याने विचारणा करताच संयोजकांना मुख्यमंत्र्यांच्या आगमनाचे वेध लागल्याचे स्पष्ट झाले. भाजपाचे कार्यकर्ते असलेल्या उदगीर शाखेच्या मसाप अध्यक्षांनी गेल्या आठवड्यात नागपूरला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, पुढे काय हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, संयोजन समितीने संमेलनाची रूपरेषा अजूनही उघड केलेली नाही. त्यामुळे निरलस, निरपेक्ष साहित्यव्यवहारात ‘राम’ उरला नसल्याचीच भावना रसिकांची झाली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घेतलेली भूमिका मध्यममार्गी आहे. राजकारण्यांना साहित्यिक मंचावर न येऊ द्यायला संमेलन काय पवित्र गायींचा गोठा आहे का? असा सवाल त्यांनी केला. तर दीर्घकाळ प्रशासनात उच्च पदे भूषवून निवृत्त झालेले देशमुख म्हणतात, ‘साहित्य आणि समाज यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही आणि प्रशासकीय अधिकारी व राजकारणी समाजपरिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना या मंचावर अस्पृश्य मानण्याचे कारण नाही. मात्र, इथे राजकीय व्यक्तिमत्त्वांनीही साहित्यिकांचा सन्मान राखावा आणि मंचाचा राजकीय वापर करू नये. सोबतच साहित्यिकांनीही स्वत:ची आब राखावी, लांगुलचालन करू नये, अशी सूचना देशमुख करतात. मराठवाड्यातीलच एका लोकप्रिय साहित्यिकाने अखिल भारतीय मंचावर ‘शरदाच्या चांदण्या’चे मुक्तकंठाने केलेले गुणगान अजूनही रसिकांच्या चांगले स्मरणात आहे. यासह त्यांच्या भाषणात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या निषेधाचे (अनवधानाने) झालेले विस्मरणही जाणकार चाहते विसरलेले नाहीत. संमेलनास मंत्रिगण उपस्थित राहिले तर एखादा लहान-मोठा निधी वा घोषणा पदरात पडेल, अशी भाबडी आशा संयोजकांना असते. मात्र, आजवर अशा मंत्र्यांनी पोकळ आवेशात दिलेली आश्वासने बहुतेकदा हवेतच विरल्याचा इतिहास आहे आणि समारोपात राजदरबारी मांडलेल्या ठरावांनाही या लोकांनी केराची टोपलीच दाखवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संतश्रेष्ठ तुकोबारायांना भेटीस बोलावले तेव्हा थोडक्या शब्दांत या संताने दिलेले उत्तर मार्मिक आहे. तुकोबा म्हणाले,‘तुम्हांपाशी आम्ही येऊनियां कायवृथा सीण आहे चालण्याचा’सतराव्या शतकात तुकारामांनी स्वाभिमान जपत राजसत्तेला सुनावलेले रोकडे बोल आजही कालसुसंगत आहेत. थोरा-मोठ्यांपुढे बळेच पदर पसरून साहित्यशारदेला किती लाचार बनवायचे याचा विचार शेवटी जबाबदारीची पदे भूषविणाऱ्या संयोजकांनीच करायला हवा. आणीबाणीत १९७५ साली कराडला भरलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या विदूषी दुर्गाबाई भागवत. या काळात लेखन स्वातंत्र्याचा आणि नवनिर्मितीवरील निर्बंध हटविण्याच्या भूमिकेचा पुरस्कार करीत त्यांनी तुरुंगवास भोगला. मात्र, पदोपदी विषमता आणि विरोधाभास पोसणाऱ्या व्यवस्थेचे कर्ते असलेल्या राजकारण्यांच्या पुढे-पुढे करण्यातच धन्यता मानणारे तथाकथित साहित्यिक हे आजचे वास्तव आहे. ल्ल शर्मिष्ठा भोसले