शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाथषष्ठी रद्द झाल्याने ७० कोटींच्या उलाढालीला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 19:44 IST

आर्थिक गणित कोलमडले, व्यापारी माघारी

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना बसला मोठा फटका  पैठण शहरातील नाथषष्ठी यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते.

- संजय जाधव 

पैठण : जवळपास ७० कोटींची उलाढाल होणारी नाथषष्ठी यात्रा प्रशासनाने ऐन वेळेवर रद्द केल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पैठण शहरातील व बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या या निर्णयामुळे जबर हादरा बसला असून, जवळपास ७० कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे. बुधवारी पैठण शहरातून परत जाताना अनेक व्यापाऱ्यांचे डोळे पाणवले होते. 

पैठण शहरातील नाथषष्ठी यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते. यात्रेत बैलगाडीपासून गळ्यातील तुळशीमाळेपर्यंत सर्वकाही मिळते. ज्या वस्तू शहरी बाजारपेठेत मिळत नाहीत, अशी घोंगडी, बेलने, पोळपाट, मृदंग, पेटी, तबला, चाटू, काठवत, भांडे, निरंजन, समयी, टाळ, अशा अनेक वस्तूंची दुकाने यात्रेत १५ दिवस व्यवसाय करतात. 

नाथषष्ठी यात्रेत व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रभरातून व्यापारी येतातच. शिवाय गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतील व्यापारीही हजेरी लावतात. नाथषष्ठीसाठी पैठण शहरातील व्यापारी महिनाभरापासून तयारी करतात. शहरातील वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता किराणा माल व कापड मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी भरून ठेवला आहे. वर्षभरात जेवढा किराणा माल विकला जातो. तेवढाच माल षष्ठी कालावधीत विकला जातो. यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने नाथषष्ठी यात्रेचे मोठे महत्त्व आहे. एकंदरीत स्थानिक व बाहेरचे व्यापारी मिळून नाथषष्ठी यात्रेत ७० कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, नाथषष्ठीच रद्द झाल्यामुळे ७० ते ८० कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे.

दीड कोटीचा रवा, मैदा खराब होणारनाथषष्ठीदरम्यान पैठण शहरात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांकडून रवा, मैदा व बेसन यासह साखर, मुरमुरे मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. नाथषष्ठीमुळे पैठण शहरातील व्यापाऱ्यांनी रवा, मैदा, बेसन, साखर आदी जवळपास दीड कोटी रुपयांचा माल दुकानात भरला आहे. यात्रा रद्द झाल्याने आता हा माल विकला जाणार नाही. दुकानातही हा माल जास्त दिवस टिकत नाही. यामुळे शहरातील किराणा व्यापाऱ्यांना रवा, मैदा विक्री न झाल्यामुळे दीड कोटीचा फटका बसणार असल्याचे किराणा व्यापारी मधुसूदन मुंदडा यांनी सांगितले.

२० लाख रुपयांचा माल उधारीवर दिला, रक्कम गुंतलीनाथषष्ठीदरम्यान धोतर, लुगडे, सेमी पैठणी व उपरणे आदींची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यामुळे दुकानातील स्टॉक वाढवला. दरम्यान, इतर व्यापाऱ्यांना षष्ठीदरम्यान विक्रीसाठी होलसेल दराने २० लाख रुपयांचा माल दिला आहे. यात्रा रद्द झाल्याने मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतून पडला आहे. पुढील काही वर्षे याचा परिणाम व्यवसायावर होण्याची भीती शहरातील कापड व्यापारी पवन लोहिया यांनी व्यक्त केली असून, इतर सर्व व्यापाऱ्यांची अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले.

देणगीतही घट होणार यात्रा रद्द करायची होती, तर अगोदर कल्पना द्यायला पाहिजे होती. यात्रेची आढावा बैठक घेऊन दुसऱ्या दिवशी प्रशासनाने यात्रा रद्द केल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे व्यापारी नंदलाल लाहोटी यांनी सांगितले. यात्रा रद्द झाल्याने नाथ संस्थानच्या देणगी पेटीलाही फटका बसणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय