शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा लेणीच्या तिकीटातील अतिरिक्त विद्युत शुल्क रद्द; जाणून घ्या नवे प्रवेश शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 13:43 IST

Ajanta Caves news : प्रवेश शुल्क ४० आणि विद्युत शुल्क ५ असे एकूण ४५ रुपये तिकीट शुल्क म्हणून आकारण्यात येत होते.

ठळक मुद्देलेणी क्रमांक १, २, १६ आणि १७ साठी विद्युत शुल्क म्हणून अतिरिक्त ५ रुपये आकारण्यात येत होते.

सोयगाव : जगप्रसिद्ध अजिंठालेणी पाहण्यासाठी प्रवेश शुल्कासोबत लागणारे अतिरिक्त विद्युत शुल्क रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय भारतीय पुरातत्त्व विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर अजिंठालेणी दर्शनासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाकडून प्रतिव्यक्ती केवळ ४० रुपये शुल्क आकारले जाणारा आहे. ( Cancellation of additional electricity charges on Ajanta Caves tickets) 

भारतीय पुरातत्त्व विभागाच्यावतीने अजिंठालेणी दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना प्रति व्यक्ती ४० रुपये तिकीट व लेणी क्रमांक १, २, १६ आणि १७ साठी विद्युत शुल्क म्हणून अतिरिक्त ५ रुपये आकारण्यात येत होते. प्रवेश शुल्क ४० आणि विद्युत शुल्क ५ असे एकूण ४५ रुपये तिकीट शुल्क म्हणून आकारण्यात येत होते. आता यातील विद्युत शुल्काचे अतिरिक्त ५ रुपये रद्द करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. यापुढे पर्यटकांना आता प्रती व्यक्ती केवळ ४० रुपये तिकीट भरून अजिंठालेणीतील चित्रशैली व शिल्पकलेचा आनंद लुटता येणार आहे. अजिंठालेणी भेटीवर आलेले पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणचे तिकीट शुल्क भरुन वैतागून जात. यातच अतिरिक्त विद्युत शुल्कावरुन अनेकदा तिकीट खिडकीवर पर्यटक हुज्जत घालतांना दिसून येत होते. हे अतिरिक्त शुल्क रद्द झाल्याने पर्यटकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. 

अजिंठा लेणी पाहताना असे लागते शुल्क अजिंठालेणी भेटीवर आलेल्या पर्यटकांकडून फर्दापूर टि-पॉइंट येथे सुविधा शुल्क म्हणून पर्यटन महामंडळ प्रतिव्यक्ती दहा रुपये आकारते, बस भाडे विनावातानूकुलित बस एकेरी फेरीसाठी २० रुपये तर वातानुकूलित बससाठी ३० रुपये एस.टी महामंडळाकडून आकारले जातात. तर  अजिंठालेणीत भारतीय पुरातत्त्व विभागाकडून प्रतिव्यक्ती ४० रुपये तिकीट आकारण्यात येते. 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण