शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज, वडगावातील अनधिकृत भूखंड नोंदणी रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:24 IST

सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया वाळूज, वडगाव हद्दीतील अनधिकृत भूखंडाच्या नोंदी रद्द करून दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी नागरिकांच्या वतीने विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले.

वाळूज महानगर : सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया वाळूज, वडगाव हद्दीतील अनधिकृत भूखंडाच्या नोंदी रद्द करून दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी नागरिकांच्या वतीने विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले.

वाळूज (बु.) गट क्रमांक ३ मध्ये शिवजी पटेल व इतरांच्या मालकीच्या जमिनीवर सिडको प्रशासनाची परवानगी न घेता हनुमाननगर नावाने प्लॉटिंग पाडण्यात आली आहे. या जमिनीचे तुकडे करून भूखंडाची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे वाळूज ग्रामपंचायतीने १६ मे रोजी आयोजित मासिक सभेत नियमबाह्यपणे हनुमाननगरातील प्लॉटिंगची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी घेण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संदीप पठारे व रविकिरण आढाव यांनी पाच महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत, तहसीलदार, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेकडे तक्रारी करून प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र, याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेची फसवणूक होत आहे. दोषी ग्रामपंचायत पदाधिकाºयांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून बेकायदेशीररीत्या मंजूर केलेले रेखांकन रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भात शनिवारी खालेद पठाण, संदीप पठारे, रविकिरण आढाव, राहुल भालेराव आदींच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

वडगावातील ५७५ नोंदींचा समावेशवडगाव ग्रामपंचायतीने बेकायदेशीररीत्या सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया विविध गट नंबरमधील जवळपास ५७५ नोंदी ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ८ ला घेतल्या आहेत. विस्तार अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत ग्रामपंचायतीने नियमबाह्य नोंदी घेतल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात जि. प. प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे.

टॅग्स :cidcoसिडकोWaluj MIDCवाळूज एमआयडीसी