शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आमच्याकडील मंगळागौरीसाठी नवीन लग्न झालेल्या तरुणी मिळतील का?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 15, 2023 15:32 IST

नवविवाहिता शोधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर

छत्रपती संभाजीनगर : आमच्याकडे पहिली मंगळागौर आहे, पूजेसाठी नवीन लग्न झालेल्या तरुणी मिळतील का, अशा मेसेजद्वारे सोशल मीडियावरील विविध ग्रुपमधून विचारणा केली जात आहे.

नवविवाहितांसाठी मंगळागौरीची पूजा अत्यंत महत्त्वाची मानले जाते. यानिमित्ताने सासरी व माहेरी एक आनंदाचे, मंगलमय वातावरण निर्माण होते. या पूजेसाठी ५ किंवा ७ नवविवाहिता लागत असतात. मात्र संपर्क कमी असल्यास या नवविवाहिता मिळत नाही. यामुळेच महिना, दीड महिना आधीपासूनच शोध सुरू होतो. पहिली मंगळागौर २२ ऑगस्टला आहे. यासाठी नवविवाहितांचा शोध सुरू झाला आहे. सोशल मीडियावर तसे मेसेज फिरू लागले आहेत.

का करतात मंगळागौरीचे पूजन ?पती-पत्नी मधील प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून ‘शिवपार्वती’ या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशीर्वाद व कृपादृष्टी असावी या हेतूने मंगळागौरीची पूजा केली जाते. लग्नानंतर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात.

मंगळागौरीला आले इव्हेंटचे स्वरुपकाळ बदलत आहे तसे सण साजरे करण्याच्या पद्धती बदलत आहेत. पूजा, व्रत व बाकीचे विधी तेच आहे, पण त्यास इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यात इव्हेंट एजन्सीचा शिरकावा झाला आहे. यामुळे मंगळागौरीची पूजा सोहळ्याला भव्य-दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.

जनसंपर्क नसल्याने पूजेला नवविवाहिता मिळणे अवघडअनेक कुटुंबे अशी आहेत की, त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांना मंगळागौरी पूजेसाठी ५ तर काहींना ७ नवविवाहिता मिळतात. पण काही ठिकाणी नवविवाहिता मिळत नाही. २ किंवा ३ जेवढ्या नवविवाहिता मिळतील, त्यांना सोबत घेऊन मंगळागौरीची पूजा केली जाते. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे पाच जणी मिळण्याची अडचण येत असावी.- प्रवीण कुलकर्णी, गुरुजी

कुमारिकांनाही करता येते मंगळागौरपूजाआमच्या ग्रुपमधील महिलांना ओळखीच्याकडून फोन येत असतात. मंगळागौरी पूजेसाठी तुमच्या ओळखीतील नवविवाहिता आहे का. दोन ते तीन महिने आधीच या नवविवाहितांच्या पूजेला जाण्याचा तारखा बुक होऊन जातात. ज्यांना पूजेसाठी नवविवाहिता मिळत नाही. त्यांना पर्याय म्हणून कुमारिका किंवा ज्या महिलांचे लग्न होऊन पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यांनाही पूजेत सहभागी करून घेता येते.- अनुराधा पुराणिक, अध्यक्षा, ओंजळ ग्रुप

मंगळागौरीच्या तारखा कोणत्या?२२ ऑगस्ट२९ ऑगस्ट५ सप्टेंबर१२ सप्टेंबर

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक