लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विधि सेवा प्राधिकरणच्या वतीने हजूर साहिब रेल्वेस्टेशनवरील फलाट क्रमांक १ वर तृतीय पंथियांच्या समस्या आणि त्यावरील उपाय या विषयावर कायदेविषयक शिबीर घेण्यात आले़अध्यक्षस्थानी न्या़डी़टी़ वसावे हे होते़ यावेळी वसावे म्हणाले, तृतीय पंथियांना जीवन जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो़ त्यांना समाजात राहण्याचा हक्क तसेच त्यांच्यासाठी असलेल्या कायदेशीर हक्काबाबतची त्यांना माहिती दिली़ यावेळी पोनि़ मंडलवार, स्टेशन मास्तर श्रीनिवास सूर्यवंशी, अॅड़ नय्युमखान पठाण, अॅड़ जगजीवन भेदे यांची उपस्थिती होती़
तृतीय पंथीयासाठी रेल्वेस्टेशनवर शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:47 IST