शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

कॅडेन्सने औरंगाबादला ७५ धावांत गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:57 IST

पुणे येथे एमसीएतर्फे सुरू असलेल्या सीनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्सने सोमवारी औरंगाबादचा पहिला डाव अवघ्या ७५ धावांत गुंडाळला आणि त्यानंतर हर्षद खडीवाले याच्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर सामन्यावरील आपली पकड मजबूत केली. औरंगाबादकडून राहुल शर्माने ५ गडी बाद करीत ठसा उमटवला. अक्षय वाईकर याच्या गोलंदाजीसमोर औरंगाबादचा पहिला डाव २५.३ षटकांत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या २५.३ षटकांत ७५ धावांत कोसळला.

ठळक मुद्देएससीए सुपर लीग : सामन्यावर मजबूत पकड, राहुल शर्माचे ५ बळी

औरंगाबाद : पुणे येथे एमसीएतर्फे सुरू असलेल्या सीनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्सने सोमवारी औरंगाबादचा पहिला डाव अवघ्या ७५ धावांत गुंडाळला आणि त्यानंतर हर्षद खडीवाले याच्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर सामन्यावरील आपली पकड मजबूत केली. औरंगाबादकडून राहुल शर्माने ५ गडी बाद करीत ठसा उमटवला.अक्षय वाईकर याच्या गोलंदाजीसमोर औरंगाबादचा पहिला डाव २५.३ षटकांत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या २५.३ षटकांत ७५ धावांत कोसळला. औरंगाबादकडून सूरज सुलाने (१४), स्वप्नील चव्हाण (१२), सचिन लव्हेरा (१२), संदीप सहानी (१०) हेच दुहेरी धावा फटकावू शकले. कॅडेन्सकडून अक्षय वाईकरने १९ धावांत ६ गडी बाद केले. त्याला नीतेश सालेकरने २२ धावांत ३ गडी बाद करीत साथ दिली. प्रत्युत्तरात अनुभवी हर्षद खडीवाले याच्या शतकी तडाख्याच्या जोरावर कॅडेन्सने सामन्यावरील आपली पकड आणखी मजबूत करताना दिवसअखेर ८ बाद ३७० धावा करीत औरंगाबादवर २९५ धावांची भक्कम आघाडी घेतली. जय पांडे याच्या साथीने २०.२ षटकांतच १२९ धावांची सलामी देणाऱ्या हर्षद खडीवाला याने १०६ चेंडूंतच १७ चौकार व ५ षटकारांसह १२१ धावांची स्फोटक खेळी केली. जय पांडे याने ५६ चेंडूंत १० चौकार, २ षटकारांसह ६६, पारस रत्नपारखीने ९६ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ६९ व सिद्धेश वरघंटेने ५४ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावांची आक्रमक खेळी केली. औरंगाबादकडून राहुल शर्मा याने १०२ धावांत ५ गडी बाद केले. स्वप्नील चव्हाणने ९८ धावांत २, तर प्रवीण क्षीरसागरने १ गडी बाद केला.