शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

बीड बायपासवर केबलचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:03 IST

सातारा-देवळाई वसाहतीत बीड बायपासवरील पथदिव्यांवर विविध केबलचे जाळे अंथरले असून, केबल टाकण्याची परवानगी नसल्याचे सांगितले जात असले तरी विद्युत विभाग व मालमत्ता विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा-देवळाई वसाहतीत बीड बायपासवरील पथदिव्यांवर विविध केबलचे जाळे अंथरले असून, केबल टाकण्याची परवानगी नसल्याचे सांगितले जात असले तरी विद्युत विभाग व मालमत्ता विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलीत आहेत. सोसाट्याच्या वा-याने वायर तुटून वाहनचालकाच्या अपघातास ते कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.सातारा-देवळाई परिसर झपाट्याने वाढला असून, महानुभाव आश्रम चौक ते देवळाई चौक दुतर्फा विविध वसाहती, दवाखाने, महाविद्यालये, व्यावसायिक दुकाने आहेत. रस्त्यावर जड वाहनांपासून ते दुचाकी व पादचा-यांची नेहमीच वर्दळ असते. अतिताण व सोसाट्याच्या वा-यात किंवा वाहनाचा धक्का खांबाला लागून वायर रस्त्यावर अडसर ठरते.लोडशेडिंग सुरू झाल्याने रस्त्यावर लटकलेले वायर दुचाकीस्वारासाठी धोका ठरू शकते. अंधारात दुचाकीस्वाराला धोकादायक वायर दिसले नाही तर गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे.पथदिव्यावर एक नव्हे, दोन नव्हे, तर डझनभर वायरींचे जाळे पसरले आहे. या वायर टाकण्यासाठी परवानगी घेतली किंवा नाही याविषयी मनपाच्या विद्युत विभागाने चेंडू मालमत्ता विभागाकडे टोलविला, तर त्यांनी तो परत विद्युत विभागाकडे टोलविला.खांबावर टाकलेल्या वायरमध्ये विद्युत प्रवाह नसल्याने त्या धोकादायक नसल्याचेही अनेकांनी मोघम मत मांडले; परंतु परवानगी घेतली नसेल तर महसूल बुडत असल्याचेही सांगितले. त्याचा सर्वे करून त्यावर कारवाई करण्यात येऊ शकते; परंतु ही जबाबदारी दुस-या विभागाकडे असल्याचेही पुन्हा टोलविले.मनपाच्या अधिका-यांनी दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रा.अरविंद अवसरमोल, संदीप कुलकर्णी, कुलदीप शिंदे, जे. के. पाटील, रूपाली गायकवाड, बाळासाहेब मोरे आदींनी केली आहे.