शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

बसच्या प्रथमोपचार पेटीलाच उपचारांची गरज

By admin | Updated: July 5, 2014 00:37 IST

सोमनाथ खताळ, बीड छोटा मोठा अपघात झाला तर तात्काळ उपचार व्हावेत, यासाठी प्रत्येक वाहनात प्रथमोपचार पेटी असते. या पेटीत प्राथमिक उपचार म्हणून औषधे, पट्टी आदी असते.

सोमनाथ खताळ, बीडछोटा मोठा अपघात झाला तर तात्काळ उपचार व्हावेत, यासाठी प्रत्येक वाहनात प्रथमोपचार पेटी असते. या पेटीत प्राथमिक उपचार म्हणून औषधे, पट्टी आदी असते. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या दुर्लक्षामुळे कुठल्याच बसमध्ये प्रथमोपचार पेटी सुसज्ज असल्याचे दिसून आले नाही. ज्या पेट्या आहेत, त्यांची दुरवस्था झाली आहे तर काही प्रथमोपचार पेट्यात औषधांऐवजी केवळ बसच्या खोल फिटींगचे साहित्य व साबण आढळून आले. शुक्रवारी बीड बसस्थानकातील २० बस गाड्यांची पाहणी केली असता कुठल्याच बसमधील प्रथमोपचार पेटीत औषधे आढळून आली नाहीत. ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेट्या होत्या, त्यांचीही दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे एसटीतील प्रथमोपचार पेटीलाच उपचाराची गरज असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.जनसामान्यांसाठी ‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी’ हे ब्रीदवाक्य घेऊन परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास अविरत सुरू आहे. सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणजे एसटी बस ; प्रवासासाठी गावागावातील प्रवाशांची आजही एसटीवर मदार आहे. एसटीला खासगी वाहनांची समांतर यंत्रणा उभी रहात असली, तरीही एसटीसारखा आरामदायी प्रवास नसल्याने अनेक प्रवाशांचा आजही एसटीकडेच ओढा आहे. एसटी चा प्रवास सुखकर, त्यामुळे कितीही दूरवरचा प्रवास असेल तर प्रवासी एसटीलाच प्रथम पसंती देतात. शहर तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला जोडणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो बसेस सद्यस्थितीत राज्यभरातील रस्त्यांवर धावत आहेत. अपघाताच्या वेळी तातडीने प्रथमोपचार करता यावा, याकरीता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील चालकाच्या केबीनमध्ये प्रथमोपचार पेटी असते; मात्र एसटीमधील प्रथमोपचार पेटीकडे महामंडळातील वरिष्ठ अधिकारी, चालक, वाहक, आगारातील कर्मचारी कोणीही लक्ष देत नसल्याने प्रथमोपचार पेटीलाच उपचाराची गरज भासू लागली आहे. या पेटीची नेमकी अवस्था काय आहे, याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी २० बसगाड्यांची पाहणी केली. अपघात घडताच उपचार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे अपघातग्रस्तांना रूग्णालयात पोहोचपर्यंत आपल्या प्राणालाही मुकावे लागते.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एसटीतील प्रथमोपचाराचे तीन तेरा वाजत आहेत.चालक-वाहक म्हणतात, अधिकाऱ्यांना विचारा...अपघात घडतात हे खरे आहे. त्यांना प्राथमिक उपचार देणेही तेवढेच गरजेचे आहे. मात्र आम्हाला महामंडळाकडूनच औषधे मिळत नसल्याने आम्ही हे औषधे आणायचे कोठून? आणि उपचार करायचा कसा? स्वत:च्या खिशातून पैसे घालून औषधे आणण्याऐवढे आम्हाला पगारही नाही. त्यासाठी या प्रथमोपचार पेट्यांबद्दल तुम्ही थेट आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच धारेवर धरा आणि त्यांनाच याचा जाब विचारा, असे काही बसमधील चालक, वाहकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रवाशांचाही कानाडोळाआपण एखाद्या वाहनात प्रवास करीत असताना त्या वाहनाला दुर्दैवाने एखादा छोटा-मोठा अपघात झाला तर त्या वाहनात प्रथमोपचाराचे साहित्य आहे का? याची कोणीही दक्षता घेत नाही. याकडे प्रवाशांचाही कानाडोळा करताना दिसून येत आहेत.प्रथमोपचार पेट्या गेल्या कुठे?शुक्रवारी बीड आगारातील बस गाड्यांची पाहणी केली असता अनेक बसगाड्यांमधील प्रथमोपचार पेट्याच गायब असल्याचे दिसून आले. पेट्या गायब झाल्या की गायब केल्या? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. गेल्या तर या पेट्या गेल्या कुठे? असाही प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करीत आहेत. ज्या दिवशी बसमध्ये प्रथमोपचार पेटी नाही, त्याच दिवशी सदरील वाहक, चालक या पेट्यांबद्दल वरिष्ठांना का माहिती पोहोचत नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे.वाहक, चालकांना नाही गांभीर्य !बसमध्ये प्रथमोपचार पेटी असणे किती महत्वाचे असते, याचे गांभीर्य चालक, वाहकांनाही नाही. त्यांना या पेट्यांबद्दल विचारले असता, ते म्हणाले, कधी गरज पडते याची, अन् हे औषध किती लोकांना पुरणार, यावरून त्यांनाही याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले.अपघाताच्या संख्येत होतेय वाढमागील आठवड्यातच पाटोदा तालुक्यातील नायगाव जवळ बस आणि टेम्पोचा अपघात झाला होता. यामध्ये टेम्पोचालक जागीच ठार झाला होता तर बसमधील १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले होते. मात्र वास्तविक पाहता या जखमी झालेल्या प्रवाशांना इतर वाहनांचा आधार घेऊन रूग्णालयात आणण्यात आले होते. प्रथमोपचाराची कुठलीही सुविधा नसल्याने अनेक प्रवाशांना तब्बल दोन तासानंतर उपचार मिळाले होते. कदाचीत प्रथमोपचाराची सुविधा असती तर या जखमी प्रवाशांच्या वेदना काही प्रमाणात नक्कीच थंडावल्या असत्या, अशा प्रतिक्रियाही रूग्णालयात आल्यानंतर ऐकावयास मिळाल्या.आम्हाला साहित्यच दिले नाहीएका बसच्या चालकाला या प्रथमोपचार पेटीबाबत विचारले असता आम्हाला महामंडळ कधीच साहित्य देत नाहीत, असे सांगितले. यावरून महामंडळाचीच उदासिनता असल्याचे दिसून येते. आम्ही पाहणी करतोआम्ही दररोज बस गाड्यांची पाहणी करून त्यामध्ये सर्व साहित्य आहे का, याची तपासणी केली जाते. तसेच प्रत्येक चालक, वाहक यांना याबाबत सांगितले जाते. जे वाहक, चालक यामध्ये हलगर्जीपणा करतात, त्यांच्यावर कारवाई करू. ज्या बसमध्ये पेट्यांची दुरवस्था झाली आहे, त्याची पाहणी करून दुरूस्ती करण्यात येईल, असे आगार प्रमुख ए.यु. पठाण म्हणाले. किट देऊन वाहकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातातबस कुठलीही असो, त्या बसमध्ये वाहक व चालक यांच्याजवळ प्रथमोपचाराचे साहित्य दिलेले आहे. ते याकडे गांभीर्याने पहात नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. त्यांचा अहवालही वरिष्ठांना पाठविण्यात येईल, असे कार्यशाळा पर्यवेक्षक ए.एस. भंडारी यांनी सांगितले.