शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

बसची ट्रॅक्टरला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:24 IST

एस.टी. महामंडळाच्या बसने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने ट्रॅक्टरमधील ५ व बसमधील ५७ प्रवासी जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअजिंठा : एस.टी. महामंडळाच्या बसने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने ट्रॅक्टरमधील ५ व बसमधील ५७ प्रवासी जखमी झाले. हा भीषण अपघात सोमवारी रात्री आठ वाजता औरंगाबाद -जळगाव महामार्गावरील अजिंठा येथे वाघूर नदीच्या पुलाजवळ घडला. सर्व जखमींवर अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन नंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद, सिल्लोड व जळगाव येथे रवाना करण्यात आले.औरंगाबादकडून जळगावकडे जाणाºया बसने (क्र. एमएच-२०-बीएल-२८९३) बाळापूरकडून मका घेऊन अजिंठ्याकडे येणाºया ट्रॅक्टरला (क्र. एमएच -३४-एल-६८७५) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचालक दिलीप सातफळे हा स्टेअरिगंमध्ये दबून तर टॅÑक्टरमधील एकबाल खान महंमदखा, नसीबखा सलीमखा, शकीलखा हे ट्रॅक्टरखाली फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच फहीम मेकॅनिक, विक्की सनान्से, अय्याज खान, फैजल मालिक, जहागीरखॉ, मेघराज चौडिये, अब्दुल वहाब, फकीरा खान, सूरज आगवाल, विजय बावस्कर, राजू पवार, सुनील काळे, मंगेश सनान्से आदींनी धाव घेऊन जखमींना अजिंठा येथील रुग्णालयात दाखल केले. डॉ. गुप्ता, डॉ. नसीर, डॉ. सोळुंके, डॉ. खान, डॉ. गणेश दसरे, डॉ. शशिकांत जोशी यांनी तातडीने जखमींवर उपचारा करुन नंतर जळगाव, औरंगाबाद, सिल्लोड येथे अधिक उपचारासाठी पाठविले.