परभणी : तालुक्यातील पोर जवळा येथील अनेक विद्यार्थिनी पिंगळी येथे शिक्षणासाठी जातात़ परंतु, एसटी आगाराच्या वतीने मानव विकास अंतर्गत बस सुरू करण्यात आली नव्हती़ त्यामुळे विद्यार्थिनींची गैरसोय होत होती़ परंतु, आगाराने मानव विकास अंतर्गत बस सुरू केल्याने विद्यार्थिनींची गैरसोय दूर झाली आहे़ त्यामुळे विद्यार्थिनी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे़ शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही पोरजवळा येथे मानव विकास अंतर्गत बस सुरू करण्यात आली नव्हती़ त्यामुळे या गावातील अनेक विद्यार्थिनींची शाळेत जाण्यासाठी गैरसोय होत होती़ काही विद्यार्थिनी खाजगी वाहनांमधून प्रवास करीत होत्या़ त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत होता़ मानव विकास अंतर्गत परभणी आगाराने पोरजवळा ते पिंगळी बस सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी व पालकांनी केली होती़ परंतु, याकडे आगाराचे दुर्लक्ष होत होते़ परंतु, सततच्या पाठपुराव्यामुळे ही बस सुरू करण्यात आली़ गावामध्ये बस आल्यानंतर ग्रामस्थांनी चालक व वाहकांचे स्वागत केले़ यावेळी सरपंच गंगाधर भुजबळ, जगन्नाथ लोखंडे, शंकर लोखंडे, शिवसांभ लोखंडे, चंद्रशेखर लोखंडे, महेश काळे यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
मानव विकास अंतर्गत बस सुरू
By admin | Updated: August 10, 2014 23:51 IST