शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या तंबीनंतरही धावतात गळक्या बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 18:44 IST

अधिकाऱ्यांना फिरविणार का? 

ठळक मुद्देगळतीकडे दुर्लक्ष, बैठकीत फक्त चर्चा रस्त्यांवर सर्रास गळक्या ‘बस’ धावताना दिसत आहेत.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : गळकी एसटी दिसल्यास त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याच एसटीतून फेरफटका मारला जाईल, अशी तंबी परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे. मात्र, ही तंबी अधिकाऱ्यांनी फारशी गांभीर्याने घेतलेली नसून, जिल्ह्यातील रस्त्यांवर सर्रास गळक्या ‘बस’ धावताना दिसत आहेत. त्यामुळे गळक्या बसमधून अधिकाऱ्यांना खरेच फिरवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच एसटी महामंडळाच्या गळक्या बसची दुरुस्ती करण्यात यावी, असे आदेश एप्रिल २०१९ मध्ये एसटी महामंडळाने दिले होते. त्यानंतर पुण्यात आषाढी एकादशीनिमित्त जादा बसविषयी ‘एसटी’ची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी गळक्या एसटीबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितला. एकही एसटी गळकी नसल्याचे अधिकाऱ्यांकडून बैठकीत सांगण्यात आले. त्यानंतर ‘एसटी‘च्या बऱ्याच बसगाड्या  गळक्या असल्याचे निदर्शनास आले आणि त्याच्या तक्रारी दिवाकर रावते यांच्यापर्यंत पोहोचल्या. मंत्री रावते यांनी गळकी एसटी दिसल्यास त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याच ‘एसटी’तून फेरफटका मारला जाईल, अशी तंबी दिली. त्यामुळे  किमान यानंतर तरी गळक्या बसची दुरुस्ती गांभीर्याने केली जाईल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे; परंतु अद्यापही गळक्या बस रस्त्यावर धावत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.

बैठकीकडे लक्षएसटी महामंडळाची त्रैमासिक बैठक सोमवारी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या उपस्थितीत शहरात होत आहे. यापूर्वी आॅक्टोबर २०१८  मध्ये झालेल्या बैठकीप्रसंगी बस जीपीएसप्रणाली आणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून मार्च २०१९ पर्यंत १०० टक्के आॅनलाईन होतील, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात ही प्रणाली रेंगाळली आहे. शिवाय गळक्या बससह अनेक प्रश्न आहेत. या सगळ्यांवर बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.

जाफराबाद-औरंगाबाद बसजाफराबादहून सिडको बसस्थानकात शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास येणाऱ्या लाल बसमधून येणाऱ्या प्रवाशांवर प्रवासादरम्यान भिजण्याची वेळ आली. ही बस गळत होती. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. जाफराबादहून येणाऱ्या अनेक बस गळत असल्याचा अनुभव प्रवाशांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. 

परिवहनमंत्री म्हणाले...यासंदर्भात परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधण्यात आला. गळक्या बससंदर्भात प्रवाशांच्या तक्रारीविषयी त्यांना माहिती देण्यात आली असता या प्रश्नाकडे अधिकारी लक्ष देतील, असे ते म्हणाले. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन