शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीहून परतणाऱ्या भाविकांची बस कंटेनरला धडकली; ११ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:28 IST

नागपूर येथील १२ जण मिनी बसने जेजुरीला दर्शनासाठी गेले होते. येथून परतताना त्यांची बस (एम.एच.४९ जे ०६३४) औरंगाबाद-नगर महामार्गावरील दहेगाव बंगला येथे रस्त्यात उभ्या असलेल्या मालवाहू कंटेनरवर (एम.एच.४० बी.जी ६६७७) येऊन धडकली.

ठळक मुद्देदहेगाव बंगला येथे अपघात  जखमींवर घाटीत उपचार सुरू

लिंबेजळगाव : औरंगाबाद-नगर महामार्गावरील दहेगाव बंगला भागात मिनी बस उभ्या असणाऱ्या कंटेनरवर धडकल्याने या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. जेजुरीहून नागपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या या मिनी बसचा या भीषण अपघातात अक्षरशः चुराडा झाला असून तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नागपूर येथील १२ जण मिनी बसने जेजुरीला दर्शनासाठी गेले होते. येथून परतताना त्यांची बस (एम.एच.४९ जे ०६३४) औरंगाबाद-नगर महामार्गावरील दहेगाव बंगला येथे रस्त्यात उभ्या असलेल्या मालवाहू कंटेनरवर (एम.एच.४० बी.जी ६६७७) येऊन धडकली. शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला असून यात हर्षदा ठाकरे (वय १०), बंडूजी ठाकरे (४१), रामभाऊ ठाकरे (७५), स्नेहा गावंडे (३०), अश्विन गावंडे (४०), माधव गावंडे (५०), विकास म्हस्के (५०, सर्व रा. नागपूर) आदी जण जखमी झाले आहेत. नागरिकांनी जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बस भरधाव असल्याने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरचा अंदाज चालकास न आल्याने ती थेट कंटेनरवर जाऊन धडकली. या अपघातात बसचा अक्षरश: चुराडा झाला. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

अपघाताच्या घटना वाढल्याऔरंगाबाद-नगर महामार्गावर अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या मार्गावर नादुरुस्त तसेच व अवजड वाहने शिस्त पाळत नसल्याने अधिक अपघात होत असून याचा फटका नागरिकांना बसत आहे. वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन शिवराईजवळ, टोलनाका परिसर, लिंबेजळगाव बस्टॅण्डवर, जिकठाण फाट्याजवळ, रहीमपूर फाटा, दहेगाव बंगला, इसारवाडी फाटा, लोखंडी पूल ही अपघातस्थळे असून येथे दिवसागणिक अपघाताचे सत्र सुरू असते.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद