शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत बर्निंग कारचा थरार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:16 IST

वाळूज एमआयडीसीतून शहराकडे जाणाऱ्या कारला आज गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास छावणी उड्डाणपुलावर अचानक आग लागली होती. या धावत्या कारला आग लागताच या रस्त्यावरून ये-जा करणा-या वाहनधारकांनी आरडाओरड केल्यामुळे कारचालकाने कार थांबविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देछावणी उड्डाणपुलावरील घटना : वाहनचालकाचे प्रसंगावधान; तिघे बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतून शहराकडे जाणाऱ्या कारला आज गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास छावणी उड्डाणपुलावर अचानक आग लागली होती. या धावत्या कारला आग लागताच या रस्त्यावरून ये-जा करणा-या वाहनधारकांनी आरडाओरड केल्यामुळे कारचालकाने कार थांबविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.याविषयी अधिक माहिती अशी की, व्ही. ए. अवसरमल व त्यांचे दोन मित्र हे कार क्रमांक एम.एच.२०, बी.एन.४९८४ मध्ये बसून आज गुरुवारी दुपारी वाळूज एमआयडीसीतून शहराकडे चालले होते. औरंगाबाद-नगर महामार्गावरून शहराकडे जात असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास छावणी उड्डाण पुलावर या कारच्या खालून आगीच्या ज्वाला निघत असल्याचे या महामार्गावरून ये-जा करणाºया वाहनधारकांना दिसून आले. या उड्डाण पुलावर चढ असल्याने तसेच वाहनांची वर्दळ असल्यामुळे कारचा वेग कमी असल्यामुळे वाहनधारकांनी आरडाओरड केल्याने कारचालक व्ही. ए. अवसरमल यांनी कार थांबवली. कार थांबताच कारच्या बोनेटमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्यामुळे घाबरलेल्या कारमधील तिघांनी बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबले. क्षणार्धात यानंतर कारने पेट घेतल्यामुळे या महामार्गावरील वाहने जागच्या जागीच थांबली होती. कारला आग लागल्यामुळे कुणीतरी अग्निशामक विभागाशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान, या ठिकाणी जवळच असलेल्या लष्करी जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूने जाणारी वाहने अडवून ठेवत कारला लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळातच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून कारवर पाण्याचा मारा करून आग विझविली.वाहनधारकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलावाळूजकडून शहराकडे ही कार जात असताना या कारच्या समोरील भागातून आगीच्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे या महामार्गावरून ये-जा करणाºया वाहनधारकांना दिसून आले होते. छावणी उड्डाण पुलावर कारचा वेग कमी असल्यामुळे वाहनधारकांनी आरडाओरड करून कारचालकास कार थांबविण्यास भाग पाडले. कारमधून तिघे प्रवासी उतरताच कारने पेट घेतला. नशीब बलवत्तर असल्याने तसेच वाहनधारकांच्या सतर्कतेमुळे या कारमधील तिघेही प्रवासी बालंबाल बचावले. या आगीच्या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळ गाठून वाहनधारक, लष्करी जवान व अग्निशामक कर्मचाºयांच्या मदतीने कारला लागलेली आग विझविण्यास मोलाची भूमिका पार पाडली.

टॅग्स :carकारAurangabadऔरंगाबाद