शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

भर दिवसा घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 00:26 IST

राजूर : येथील एका व्यापाऱ्याचे चोरट्यांनी घर फोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी भर दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली

राजूर : येथील एका व्यापाऱ्याचे चोरट्यांनी घर फोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी भर दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यामधे सुमारे ३ लाख २० हजार रूपयांचा ऐवज लंपास झाला आहे. भर दुपारी गजबजलेल्या ठिकाणी घरफोडी झाल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी राजूरला भेट देऊन पोलिसांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच तपासाबाबत योग्य त्या सूचना केल्या.राजूर येथील मनोज शंकरलाल काबरा यांचे मेडिकल दुकान आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी घर बंद करून दुकानात गेल्या होत्या. येथे श्री जन्मोत्सवनिमित्त यात्रा भरलेली आहे. त्यामुळे राजुरात गर्दी वाढलेली आहे. चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधून घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. काबरा यांची पत्नी घरी गेल्यानंतर त्यांना घराचा कोयंडा तुटलेला दिसला. घरात गेल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. यामधे रोख ९० हजार रूपये, चांदीचे दोन ग्लास, वाटी, पळी, सोन्याचे जोड, करंडे, बिंदीया असा दोन लाख २० हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास झाल्याचे दिसून आले. मनोज काबरा यांच्या पुतणीचे येत्या १६ तारखेला लग्न आहे. काबरा परिवार लग्नाच्या तयारीत आहे. मुलीच्या लग्नासाठी सोन्या, चांदीचे दागिने खरेदी करून घरात ठेवले होते. मात्र चोरट्यांनी त्याच्यावर डल्ला मारला. काबरा यांचे घर गजबजलेल्या ठिकाणी असून मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. भरवस्तीत चोरी झाल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे. चोरीची माहिती मिळताच भोकरदनचे उपविभागीय अधिकारी ईश्वर वसावे यांच्यासह हसनाबाद ठाण्याचे स.पो.नि.किरण बिडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच जालन्याहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांनी भेट दिली. तसेच दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख विनोद ईज्जपवार, स्थानिक गुन्हे शाखेचे भाले यांनी भेट दिली. याप्रकरणी राजूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.