अशोक सनानसे यांच्या मालकीचे बैल अजय तोमर यांच्या शेतात कोळपणी करीत होते. कोळपणीनंतर चरावयास सोडल्यावर सापाने दंश केल्याने बैलाचा मृत्यू झाला. सापाने दंश केल्याने बैल जमिनीवर कोसळला. तेथे शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेतली, असे शेतकरी अजय तोमर यांनी सांगितले. या घटनेत शेतकऱ्यांचे जवळपास ७० हजारांचे नुकसान झाले आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
छाया:- अंधारी शिवारात सर्प दंशाने बैलाचा मृत्यू झाला.