शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा अर्थसंकल्प अद्याप अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:26 IST

मनपा प्रशासनाने २६ मार्च रोजी १२७४ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपयांचा ३६ वा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. या अर्थसंकल्पाला अद्याप स्थायी समितीने मंजुरी दिलेली नाही. एवढा मोठा अर्थसंकल्प अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. २० दिवस उलटले तरी नगरसेवकांचा अभ्यासच सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मनपा प्रशासनाने २६ मार्च रोजी १२७४ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपयांचा ३६ वा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. या अर्थसंकल्पाला अद्याप स्थायी समितीने मंजुरी दिलेली नाही. एवढा मोठा अर्थसंकल्प अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. २० दिवस उलटले तरी नगरसेवकांचा अभ्यासच सुरू आहे.२६ मार्च रोजी अर्थसंकल्पासाठी स्थायी समितीच्या विशेष बैैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत नवल किशोर राम यांनी सभापती गजानन बारवाल यांना अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्येही राम यांनी सांगितली. यावेळी सभागृहातील सदस्यांनी अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी केली. सभापतींनी ही मागणी मान्य करून लवकरच स्थायीची बैठक घेऊन अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीला विविध विकासकामे टाकायची आहेत. कोट्यवधी रुपयांची कामे यात टाकण्यात येणार आहेत. भाजप नगरसेवकांचे जास्तीत जास्त अर्थसंकल्पाचा फायदा कसा होईल, यादृष्टीने काम सुरू आहे. स्थायी समितीचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपत आहे. १६ पैकी ८ सदस्य दहा पंधरा दिवसांनंतर निवृत्त होणार आहेत. यामध्ये स्वत: सभापती बारवाल यांचाही समावेश आहे. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर सभापती सर्वसाधारण सभेला अर्थसंकल्प सादर करतील. येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये हे शक्य आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सर्वसाधारण सभा किमान १०० कोटी रुपयांची वाढ अर्थसंकल्पात करणार हे निश्चित.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्प 2023