शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कौर्याची परिसीमा; प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या भावाची गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 19:38 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषण व पैठण पोलिसांनी २४ तासाच्या आत या खुनाचा छडा लावून मयत शिवाजी लोखंडेच्या सख्ख्या भावास अटक केली आहे.

पैठण : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून सख्खा भावानेच खुन केल्याची घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. 

पैठण शहरात रविवारी स्कूल बस चालक शिवाजी लोखंडे याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खुन झाल्याचे उघड झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण व पैठण पोलिसांनी २४ तासाच्या आत या खुनाचा छडा लावून मयत शिवाजी लोखंडेच्या सख्ख्या भावास अटक केली आहे. आरोपी गोरख लोखंडे  हा शिवाजी लोखंडे याचा सख्खा भाऊ असून शिवाजी लोखंडेच्या पत्नी सोबत त्याचे प्रेम संबंध होते. 

मयत  शिवाजी विठ्ठल लोखंडे वय ४० वर्ष रा . पाचपिंपळ गल्ली , पैठण याचा अज्ञात इसमाने  गळयावर धारदार शस्त्राने वार करुन  खुन केल्याची घटना उघडकीस आली होती.  पोलीस ठाणे पैठण येथे या प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल झाला होता. . सदर गुन्हयाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील , औरंगाबाद ग्रामीण यांच्या आदेशाने सहा पोलीस अधीक्षक  गोरख भामरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंंदे , पैठण - पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या पथकाने तात्काळ  घटनास्थळाची पाहणी करुन  तपासाची चक्रे फिरवली, गोपनीय माहिती आधारे तसेच तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे मयताचा लहान भाऊ  गोरख विठ्ठल लोखंडे  राहता जि अहमदनगर येथे राहतो.

दरम्यान,आठ दिवसांपूर्वी मयताची पत्नी मुलांसह राहता येथे गेली होती .  घटनेच्या दिवशी गोरख विठ्ठल लोखंडे हा पैठण येथे आल्याची माहिती मिळाली होती , त्यावरुन पोलिसांनी गोरख लोखंडे यास ताब्यात घेतले होते . पोलिसांनी राहता येथे  चौकशी केली असता गोरख लोखंडे हा दिनांक १७ रोजी सायंकाळी पाणी भरायला जातो असे सांगून घराबाहेर गेला होता , तो दिनांक १८  रोजी सकाळी ६ वा  परत घरी आला होता , या आधारे गोरख लोखंडे याच्याकडे पोलिसांनी उलट तपासणी करुन त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता त्याने मयत शिवाजी लोखंडे याच्या पत्नी सोबत  प्रेमसंबध होते , मयत शिवाजी लोखंडे हा त्यांच्या प्रेम संबधामध्ये अडथळा ठरत असल्याने  त्याचा खुन केल्याची कबुली दिली .

पोलीस अधिक्षक  मोक्षदा पाटील , अपर पोलीस अधिक्षक गणेश गावडे , सहा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख,सहा . पोलीस निरीक्षक सुदाम वारे , पोलीस उपनिरीक्षक संतोष माने , रामकृष्ण सागडे , सचिन सानप , भगतसिंग दुलत , फौजदार गफार पठाण , सुधाकर दौड , झिया चाँद ,  संजय काळे , प्रमोद खांडेभराड , रतन वारे , पोना राहूल पगारे , संजय भोसले पोकॉ योगेश तरमाळे , उमेश बकले , संजय तांदळे, राजू शेख भगवान सिंगल , करतार सिंगल , पोकॉ बनगे , चालक पोकॉ ढाकणे यांनी ही काामगीरी केली आहे. मयत शिवाजी लोखंडेच्या पत्नीस पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.