शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ब्रदरचा त्रास; सिस्टरचा गळफास

By admin | Updated: June 12, 2016 00:04 IST

पैठण : येथील शासकीय रुग्णालयातील परिचारिका सोनाली भास्कर कदम (२९) हिने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेत मृत्यूला कवटाळले होते.

पैठण : येथील शासकीय रुग्णालयातील परिचारिका सोनाली भास्कर कदम (२९) हिने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेत मृत्यूला कवटाळले होते. घरात सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शासकीय रुग्णालयातील तिचा सहकारी कर्मचारी, त्याची बायको व सासरा, अशा तिघांवर गुन्हा दाखल केला. मयत सोनालीचे वडील भास्कर सखाराम कदम (६१, रा. सुगाव, ता. अकोले, जिल्हा अहमदनगर) यांनी शुक्रवारी रात्री पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत असे म्हटले आहे की, सोनाली हिने गळफास घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या नोटमध्ये तिने तिच्यासोबत काम करणाऱ्या भारत आबासाहेब वाणी, त्याची पत्नी तृप्ती वाणी व तृप्तीचे वडील राजू गुळवे यांची नावे लिहून ठेवली आहेत. या तिघांनी संगनमताने सोनालीचा शारीरिक मानसिक छळ केला. तिला वारंवार लग्न मोडून टाकीन, जीवन बरबाद करून टाकू, अशा धमक्या दिल्या होत्या. ती शासकीय रुग्णालयात असताना तिला भारत वाणी हा मारहाण करायचा. या सर्व त्रासाला कंटाळून सोनालीने मृत्यूला कवटाळले. मयत सोनालीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.दीड महिन्यापूर्वी झाला विवाहसोनालीचा विवाह २२ एप्रिल २०१६ रोजी गणेश वाकचौरे (रा. नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर) या तरुणाशी मोठ्या थाटामाटात झाला होता. नवदाम्पत्याने महिनाभरापूर्वी येथील शासकीय निवासस्थानात संसार थाटला होता. भारत वाणी, त्याची बायको व नातेवाईक माझ्या मुलीला सातत्याने त्रास देत असल्याने भारत वाणी आपला संसार होऊ देणार नाही, या नैराश्यातून अखेर सोनालीने स्वत:ला संपवून टाकले. या लोकांवर कडक कारवाई करा, असे सोनालीचे वडील पोलिसांना सांगत होते. सुतारकाम करून मुलीला वाढविले, शिकविले, तिला नोकरीस लावले, कर्ज काढून लग्न केले. या लोकांनी त्रास दिल्याने माझी सोनाली मला न बोलता कायमची निघून गेली. माझ्यात तिचा फार जीव होता. मला ती रोज बोलत होती. मग आज का बोलली नाही, म्हणत सोनालीचे वडील धायमोकलून ढसाढसा रडायला लागले आणि सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या. दोन दिवसांपूर्वी भांडण?दोन दिवसांपूर्वी सोनाली घरात एकटी असताना आरोपी वाणी व त्याची पत्नी तृप्ती यांनी तिच्या घरी येऊन तिच्याशी किरकिर घातली होती, अशी चर्चा या परिसरातील रहिवासी करीत होते. आरोपी फरार या प्रकरणातील आरोपी भारत वाणी व त्याची पत्नी तृप्ती वाणीसह त्याचा सासरा राजू गुळवे हे घटना घडल्यापासून पैठण येथून फरार झाले आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बढे यांनी सांगितले.सुसाईड नोट जप्तती सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली असून, या नोटमध्ये आरोपींनी तिला त्रास दिला असल्याचे तिने लिहून ठेवले असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी व सपानि. सुजित बढे यांनी सांगितले.