शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ... काम मिळेल का काम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:16 IST

दरवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजूर कापूस वेचण्यासाठी वैजापूर तालुक्यात येतात; मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशीचे पीक बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाले. यंदाचा हंगाम हातचा गेल्याने हताश झालेले परप्रांतीय मजूर आता पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गृहलक्ष्मीला सोबत घेऊन कामाच्या शोधात चक्क वणवण भटकताना दिसत आहेत.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : दरवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजूर कापूस वेचण्यासाठी वैजापूर तालुक्यात येतात; मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशीचे पीक बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाले. यंदाचा हंगाम हातचा गेल्याने हताश झालेले परप्रांतीय मजूर आता पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गृहलक्ष्मीला सोबत घेऊन कामाच्या शोधात चक्क वणवण भटकताना दिसत आहेत. ते ‘भाऊ...काही काम आहे का काम’ अशी रस्त्यावर विचारणा करत असल्याचे विदारक तालुक्यात दिसत आहे.तालुक्यात दहा महसूल मंडळांतर्गत ७६ हजार हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणाºया शेतकºयांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला. यामध्ये कापूस वेचणीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधून आलेल्या जवळपास दहा हजार परप्रांतीय मजुरांनाही मोठा फटका बसला आहे. तालुक्यात कापसाचे पीक जोमात आले. मात्र, माप पदरात पडण्याआधीच बोंडअळीने खेळ केला. त्यामुळे परप्रांतीय मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. शेतात कामच नसल्याने हे मजूर शहरातील कॉलेज रोड, हायवे चौफुली, स्टेशन रोडवर दररोज सकाळी येऊन थांबतात. मजुरांना कामाला लावण्यासाठी एखादा व्यक्ती येथे आल्यास शेकडो मजूर त्याच्याभोवती गराडा घालतात.भाऊ, कोणतेही काम सांगा, आम्ही करतो. काय बी असू द्या आम्ही दोघे, तिघे, चौघेजण मिळून करतो, अशी विनवणी केली जाते. परंतु त्या व्यक्तीला एक किंवा दोनच मजूर पाहिजे असतात. दोन मजुरांना घेऊन गेल्यानंतर बाकीचे मजूर नाराज होऊन दुसºया व्यक्तीची वाट पाहतात.तालुक्यात मागील काही वर्षांपासून शेतीकामासाठी मजूर पुरवणारे ठेकेदार कार्यरत झाले आहेत. यात गुजरात आणि मध्यप्रदेशातील मजुरांचा सर्वाधिक भरणा आहे. प्रतिएकर दर ठरवून काम करण्याची त्यांची पद्धत आहे. कमी कालावधी व वाजवी मजुरीत काम उरकण्यावर परप्रांतीयांचा भर असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.कांद्याची लागवड, गव्हाला पाणी देणे, ऊस लागवड आणि कापूस वेचणीचे काम परप्रांतीय मजूर करीत असतात. ३० ते ५० मजुरांची टोळी पन्नास ते साठ गावात शेतकºयांकडे विभागून काम करतात. सध्या परप्रांतीयांच्या या बाजारात महिन्यापासून गर्दी वाढली आहे.वैजापूर तालुक्यात दरवर्षी कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, यंदा बोंडअळीचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकºयांना सोसावा लागत आहे. यंदा सुमारे सत्तर टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे तालुक्याला दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा फटका बसल्याचे तालुका कृषी अधिकारी विष्णू मोरे यांनी सांगितले.