शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ण चंद्राच्या प्रकाशात उजळले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:58 IST

पूर्ण चंद्राच्या शीतल प्रकाशाने शहर उजळून निघाले होते. अनेक घरांत मंत्रोच्चार सुरू होते, तर काही ठिकाणी परिवारांमध्ये गप्पांची मैफल रंगली होती.

ठळक मुद्देकोजागरी पौर्णिमा : केशर, चारोळीमिश्रित आटीव दुधाचा हजारोंनी घेतला आस्वाद

औरंगाबाद : पूर्ण चंद्राच्या शीतल प्रकाशाने शहर उजळून निघाले होते. अनेक घरांत मंत्रोच्चार सुरू होते, तर काही ठिकाणी परिवारांमध्ये गप्पांची मैफल रंगली होती. मध्यरात्री केशर, चारोळीमिश्रित आटीव दुधाचा आस्वाद घेत साऱ्यांनी मंगळवारी कोजागरी पौर्णिमा साजरी केली.अश्विनी पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी करण्यात आली. या दिवशी चंद्राचे शीतल किरण पडलेले केशर-चारोळीमिश्रित आटीव दूध पिण्याचा आनंदच काही और असतो. आजही त्याची प्रचीती शहरवासीयांना आली. पूर्वी जवाहर कॉलनी, ज्योतीनगर, सहकारनगर, टिळकनगर, उल्कानगरी, सिडको एन-८, एन-५, महाजन कॉलनी आदी भागातील अपार्टमेंटच्या गच्चीवर सर्व परिवार मिळून कोजागरी पौर्णिमा साजरी केली जात होती. मात्र, हळूहळू ही प्रथा कमी होताना आज प्रखरतेने जाणवले. आपल्या कुटुंबापुरतीच कोजागरी साजरी करण्याकडे अनेकांचा कल दिसून आला. अनेकांनी घरातच दूध आटवून नंतर गच्चीवर जाऊन किंवा अंगणात दुधाचे भांडे ठेवले होते. मध्यरात्री १२ वाजता चंद्राचे शीतल किरण त्या दुधावर पडले त्यावेळी चंद्राची पूजा व आरती करण्यात आली नंतर सर्वांनी दुधाचा आस्वाद घेतला. कोजागरीला कोण जागे आहे, हे पाहण्यासाठी लक्ष्मी देवी सर्वत्र फिरत असते, असे म्हटले जाते. यामुळे अनेक धार्मिक घरांमध्ये अख्खा परिवार देवीचा जाप, मंत्रोच्चार करताना दिसून आला. शहरातील काही नामवंत गायकांच्या घरी मात्र, गुरू-शिष्यांच्या गाण्याची मैफल रमली होती. काहींनी चक्क हॉटेलमध्ये जाऊन आटीव दूध पिण्याचा आस्वाद घेतला. जवाहर कॉलनी, सावरकर चौक, बजरंग चौक, टीव्ही सेंटर, औरंगपुरा, मछलीखडक आदी भागातील हॉटेलमध्ये गर्दी दिसून आली.चौकटतीन लाख लिटर दुधाची विक्रीशहरात दररोज पावणेदोन ते दोन लाख लिटर दुधाची आवक होत असते. आज दुधाची मागणी वाढली होती. पॅकिंगमधील तसेच सुटे दूधही मोठ्या प्रमाणात शहरात आले होते. दूध मुबलक असल्याने अनेकांनी सायंकाळनंतरच दूध खरेदी करणे पसंत केले. दूध व्यावसायिकांच्या माहितीनुसार मंगळवारी शहरात जिल्ह्यातून व परजिल्ह्यातून आलेल्या तीन लाख लिटर दुधाची विक्री झाली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmilkदूध