जयपाल ठाकूर आलमलाऔसा तालुक्यातील आलमला येथील तावरजा नदीला सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे पुलालगतचा अर्धा रस्ता वाहून गेल्याने रोडवर भला मोठा खड््डा पडला आहे़ शिवाय, आलमला ते तांडा वस्तीत जाणाऱ्या १७ कमानी पुलाला तडे गेल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे़ रस्ता वाहून गेल्यानंतर प्रशासनाने याची साधी पाहणीही केली नाही़ सहा महिने लोटले तरी रस्त्याची अवस्था जैसे थे आहे़ सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तावरजा नदीला पूर आला़ पुराचे पाणी नदीपात्राच्या बाहेर गेल्याने आलमला-आलमला तांडा रोडवरील पुलाच्या दोन्ही बाजूने रोड खचून अर्धा रस्ता वाहून गेला़ तावरजा नदीवर साधारणत: १६ वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाला मधोमध मोठा तडाही गेला आहे़ सध्या या पुलावरून वाहतूक करणाऱ्या शेतकरी, वाहनधारकांत भीतीचे वातावरण आहे़ अगोदरच सदरील पूल हा अत्यंत अरुंद आहे व त्यातच सदरील पुलाच्या जवळच मोठ्ठा खड्डा पडल्याने रात्रीच्या वेळी येणाऱ्या बहुतांश वाहनांचा अपघात ठरलेला आहे़ नवीन वाहनधारक तर या मार्गाने रात्री प्रवास करणे अशक्यच आहे़ शेतात जात असताना रात्री वेळी खड्ड्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत़
आलमल्याच्या तावरजा नदीवरील पुलाला गेले तडे
By admin | Updated: March 25, 2017 23:11 IST