हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथे १८ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास माळी गल्लीत दोन युवकांमध्ये झालेल्या वादातून गोंधळ झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली आहे.सोमवारी रात्री दोन गटात झालेल्या वादामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात आरोपी पवन भवर, वैभव भवर, गजानन वंजे, विजय जगताप, संतोष शितळे, कमलाकर चट्टे, आकाश उगले, दशरथ चट्टे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक जगताप यांनी गावास भेट दिली असून अधिक तपास सपोनि अशोक चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि मौलाखाँ पठाण करीत आहेत. (वार्ताहर)महिलेस मारहाणहट्टा : औंढा तालुक्यातील आजरसोंडा येथे सोमवारी द्वारकाबाई गायकवाड या महिलेस लाथाबुक्क्याने मारहाण करून जीेवे मारण्याची धमकी देण्यात आली. सदरील महिलेच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात आरोपी माणिक गायकवाड, ईश्वर गायकवाड, बालू गायकवाड, रमेश गायकवाड यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि किशोर पोटे करीत आहेत. (वार्ताहर)
शांतता भंग; आठ आरोपी अटकेत
By admin | Updated: August 20, 2014 00:23 IST