शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडू, पण मुलांना उच्च शिक्षण देऊ

By admin | Updated: June 16, 2016 00:15 IST

औरंगाबाद : आणखी दहा वर्षे कष्ट करू, ऊसतोड करू; परंतु मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू, असा निर्धार पैठण तालुक्यातील वरंवडी तांडा येथील नं. २ केंद्र, निलजगाव येथील पालकांनी केला.

औरंगाबाद : आणखी दहा वर्षे कष्ट करू, ऊसतोड करू; परंतु मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू, असा निर्धार पैठण तालुक्यातील वरंवडी तांडा येथील नं. २ केंद्र, निलजगाव येथील पाल्यांच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना केला. या शाळेतील विद्यार्थ्यांनीदेखील ‘ज्ञानरचनावाद’ आणि शाळेमुळे परिवर्तन होत असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगत पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करणार असल्याचे नमूद केले.आई-वडील ऊस तोडणीला गेल्यानंतरही चिमुकल्या हाताने स्वयंपाक बनविला, पण शाळा बुडविली नाही. खूप शिकून डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे आहे, असा निर्धार ऊसतोड कामगारांच्या मुलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोडपणे त्यांनी उत्तरे देऊन सर्वांना चकित केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागातर्फे शाळा प्रवेश, शाळा उत्सव कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, लातूर, नंदूरबार, धुळे, पुणे, ठाणे या सहा जिल्ह्यांतील आदिवासी, दुर्गम, तांड्यावरील शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे थेट संवाद साधला. दुपारी २ वाजता पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला सुरुवात झाली. मुले ऊसतोडीला गेली नाहीततांडा व परिसरातील एकही मूल यंदा ऊसतोडीला गेले नाही. आजी-आजोबाजवळ राहून चिमुकल्यांनी स्वत: स्वयंपाक करून शाळेत हजेरी लावली. कोमल राठोड या विद्यार्थिनीस मुख्यमंत्र्यांनी प्रश्न केला, तुला शाळेत काय आवडते? ती म्हणाली की, सौरऊर्जेवर ई-लर्निंगचे शिक्षण मिळते, शाळेत बँक सुरू केली, बाग फुलविली, खेळणी, फुले यामध्ये आमचा दिवस जातो. शिक्षक चांगले शिकवीत असून, ज्ञानरचनावाद उपक्रमातून खूप शिकायला मिळते. वैशाली राठोड म्हणाली की, माझे आई-वडील ऊसतोडीचे काम करतात. पंरतु मी त्यांच्यासोबत जात नाही. मला इंग्रजी विषय आवडतो. घरी स्वयंपाक करून भावांना घेऊन मी शाळेत येते. मलाही डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे आहे.पालक अण्णा राठोड म्हणाले की, शिक्षकांनी सांगितलेले आम्हाला पटले. मुलांना ऊसतोडीसाठी सोबत नेले नाही, त्यांना शाळेत टाकले, तांड्यावरील कोणीही शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी घेतली. हिरामण राठोड म्हणाले की, आणखी १० वर्षे आम्ही ऊसतोडी करू, पण मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू.