शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

धोंड्याच्या वारीने गर्दीचा विक्रम मोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 20:49 IST

कमला एकादशी : गोदास्नानानंतर लाखो भाविकांनी घेतले नाथांचे दर्शन; मोठ्या प्रमाणावर दानधर्म

पैठण : अधिक महिन्यात आलेल्या कमला एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने शुक्रवारी लाखो भाविकांनी पैठणनगरीत हजेरी लावली. धोंड्याच्या वारीतील गर्दीचा विक्रम आज मोडीत निघाला. गोदेच्या पवित्र स्नानासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीने गोदावरीचे जवळपास सर्वच घाट भाविकांनी फुलून गेले होते. दिवसभरात दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज नाथ संस्थानच्या वतीने व्यक्त करण्यात आला. भाविकांच्या गर्दीचा अंदाज चुकल्याने सर्वच यंत्रणेवर दिवसभर ताण जाणवत होता.या एकादशीच्या मुहूर्तावर गंगास्नान, बत्ताशे व अनारसे दान, दिपदानास विशेष महत्व असल्याचे अनंत खरे, समीर शुक्ल यांनी सांगितले. आज पहाटेपासूनच भाविकांचे पैठणमध्ये आगमन सुरू झाले. गोदावरीनदीच्या कृष्णकमल व मोक्ष घाटावर स्नानासाठी महिला भाविकांचीही मोठी गर्दी झाली. यामुळे घाटावरील व्यवस्था अपुरी पडली. गोदास्नानासाठी सुध्दा भाविकांना प्रतिक्षा करावी लागली. गोदेचे स्नान करून नाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन वारकरी परत जात होते. आजची वारी धोंड्याची वारी म्हणून प्रसिद्ध आहे. यासाठी लाखो भाविक आज दिंड्या घेऊन ‘भानुदास एकनाथ’चा गजर करीत नाथनगरीत दाखल झाल.गर्दीमुळे सर्व यंत्रणांचे व्यवस्थापन कोलमडलेभाविकांनी एकच गर्दी केल्याने सर्व यंत्रणांचे व्यवस्थापन वारंवार कोलमडून पडले. शहरात वारंवार वाहतूक ठप्प होत होती. बसस्थानकावरही बस गाठण्यासाठी व आलेल्या बसला स्थानकात जागा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. शहरात येणारे सर्वच रस्ते हाऊसफूल झाल्याने मोठी तारांबळ उडत होती. पोलीस निरीक्षक चंदन इमले, सहायक पोलीस निरीक्षक एस.के. वारे हे दिवसभर फिरून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत होते.नाथषष्ठीच्या वातावरणाची पुन्हा एकदा अनुभूतीशहरातील सर्व धर्मशाळा, मठ व मंदिरे भाविकांच्या उपस्थितीने खचाखच भरली होती. दिवसभर ‘भानुदास एकनाथ’चा गजर करीत दिंड्यांसह वारकºयांचे आगमन सुरू होते. रात्रभर मठात, मंदिरात थांबलेल्या वारकºयांचे कीर्तन, प्रवचनाचे स्वर निनादत होते. हरिनामाच्या गजराने पैठणनगरी निनादून गेली. नाथषष्ठीच्या वातावरणाची पुन्हा एकदा पैठणकरांना अनुभूती आली. आज आलेल्या भाविकात महिलांची संख्या लक्षणीय होती. एकूण भाविकांच्या ७० टक्के महिला होत्या. महिलांनी विष्णूला प्रिय असलेले बत्तासे अर्पण करून दान धर्म केला.पाकिटमारांची चांदीमंदिर परिसरातील गर्दी व श्रध्देने आलेल्या महिला भाविकांना चोरट्यांनी चांगलाच फटका दिला. भाविकांच्या पाकीटांवर चोरट्यांनी डल्ला मारला.

टॅग्स :godavariगोदावरीriverनदी