शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समन्वय बैठकांना ब्रेक; लॉकडाऊन करताना लोकप्रतिनिधीना अंशत: विचारलेही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 12:46 IST

Partial Lockdown in Aurangabad जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक, पोलीस आयुक्त, अधीक्षकांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने घेतलेल्या संयुक्त बैठकीपूर्वी लोकप्रतिनिधींची बैठकही घेतली नाही. किंबहुना त्यांना याबाबत काही सूचनादेखील केल्या नाहीत.

ठळक मुद्देजूलैपासून सुरू झालेला प्रशासन व लोकप्रतिनिधीमधील संवादही खुंटला

औरंगाबाद : कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय घेतांना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अंशत: देखील विचारले नाही. शनिवारी आणि रविवारच्या १०० टक्के लॉकडाऊनवरून लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर आगपाखड सुरू केली आहे.दुसरीकडे कोरोनाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि निर्णयाबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वय राहावा, यासाठी जुलै २०२० पासून दर सोमवारी होणाऱ्या बैठकीला ऑक्टोबर २०२० पासून ब्रेक लागला तो आजपर्यंत कायम आहे.

जुलै महिन्यांत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर आगपाखड करून समन्वय नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपा, जिल्हाप्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेत मध्यस्थी केली. आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रशासनाने दर सोमवारी नियमित बैठक आयोजित केली. कोरोनाचे रुग्ण कमी होताच, बैठकही गुंडाळण्यात आली.२०२० मध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतील दर सोमवारी बैठक झाल्यात. त्यात रुग्णालयात खाटांची संख्या वाढविणे, टेस्ट वाढविणे, खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या वाढीव बिलांचे परीक्षण करणे, व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यासारखे महत्त्वाचे निर्णय झाले.

लोकप्रतिनिधींचा चक्क विसरजिल्हाधिकारी, मनपा प्रशासक, पोलीस आयुक्त, अधीक्षकांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने घेतलेल्या संयुक्त बैठकीपूर्वी लोकप्रतिनिधींची बैठकही घेतली नाही. किंबहुना त्यांना याबाबत काही सूचनादेखील केल्या नाहीत.

संसर्ग संपल्याचा सर्वांचाच अविर्भावकोरोनाचा संसर्ग संपल्याच्या अविर्भावात सगळेच वावरत होते. लोकप्रतिनिधींनीदेखील गर्दीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. इकडे प्रशासनानेही सोहळ्यांकडे दुर्लक्ष केले. क्वारंटाईन सेंटरची व्यवस्था गुंडाळण्यात आली. लसीकरण सुरू झाल्यामुळे सगळे आलबेल होणार असे वाटत असतांनाच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा एबीसीडीपासून सगळी सुरुवात प्रशासनाला करावी लागत आहे.

प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतलाखा.डॉ.भागवत कराड म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून बैठक घेणे अपेक्षित होते. व्यापारी, उद्योजक, सामान्य नागरिकांना विश्वासात घेण्याऐवजी प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतला आहे. उपचाराची क्षमता, क्वारंटाईन सेंटर्स, खासगी रुग्णालयांतील उपचार याबाबत सगळेच अधांतरी असल्याचे दिसते आहे.

शनिवार, रविवार विषाणू सुटीवर असतो काखा.इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियातून टीका करतांना म्हटले आहे, शनिवारी आणि रविवारी कोरोनाचा विषाणू सुटीवर असणार आहे काय? विषाणूने प्रशासकीय यंत्रणेला सांगितले आहे का, तो केव्हा येणार आणि संसर्ग वाढविणार. ५०० कामगार उद्योगात जाऊ शकतात, परंतु मास्क घातलेले १०० नागरिक विवाहात सहभागी होऊ शकत नाहीत. हे खेदजनक आहे.

लॉकडाऊनची ही पध्दत नाहीआ.संजय शिरसाट म्हणाले, लॉकडाऊन करण्याची ही पध्दत नाही. परमिट रूम रात्री ९ वाजेपर्यंत चालू ठेवायचे आणि व्यायामशाळा, जिम बंद ठेवायचे. लॉकडाऊनची लोकांची मानसिकता नाही. एकदम निर्णय घेणे योग्य नाही. अधिवेशनातून परतल्यानंतर प्रशासनाला याबाबत विचारणा करण्यात येईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या