शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक हवामान बदलावर उद्या मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:32 IST

हवामान बदल व त्याचे शेतीवर होणारे परिणाम यावर सातत्याने संशोधन करणारे देश व विदेशातील शास्त्रज्ञ शहरात येत आहेत. एवढेच नव्हे तर राज्यातील चारही कृषी विद्यापीठ पुन्हा एकदा एकत्रित येऊन विचारमंथन करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हवामान बदल व त्याचे शेतीवर होणारे परिणाम यावर सातत्याने संशोधन करणारे देश व विदेशातील शास्त्रज्ञ शहरात येत आहेत. एवढेच नव्हे तर राज्यातील चारही कृषी विद्यापीठ पुन्हा एकदा एकत्रित येऊन विचारमंथन करणार आहेत. १४ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाºया या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून निघालेले निष्कर्ष, उपाययोजना राज्य शासन, शास्त्रज्ञ, शेतकºयांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.एमजीएम महाविद्यालयातील रुक्मिणी सभागृहात १४ रोजी हवामान बदलावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी वाल्मी येथे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू वेंकटेश्वरलू यांनी पत्रपरिषद घेतली. कुलगुरूंनी सांगितले की, बदलते हवामान व त्याचा कृषी क्षेत्रावर होणाºया परिणामावर देश-विदेशात संशोधन सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात शास्त्रज्ञ संशोधन, नवतंत्रज्ञानाची माहिती देणार आहे. शिवाय भविष्यातील हवामानबदलाच्या आव्हानांना कसे सामोरे जायचे व कोणत्या परिस्थितीत कोणते पीक शेतकºयाला तारू शकेल. याचा दिशादर्शक अहवाल या चर्चासत्रातील सखोल मंथनातून तयार करण्यात येणार आहे. याचा फायदा राज्य शासनाला त्यांचे शेतीविषयक धोरण ठरविण्यात मोठा उपयोग होईल, तसेच कृषी उद्योग तसेच शेतकºयांनाही अहवाल अतिउपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. चर्चासत्राचे उद्घाटन नीती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद करणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी पद्मभूषण डॉ. आर. एस. परोडा व चारही कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची उपस्थिती राहणार आहे. वाल्मी येथे १२ सत्रात प्रत्येक विषयावर सखोल विचारमंथन होणार आहे. शास्त्रज्ञांसाठी प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.या प्रदर्शनात शेतकºयांसाठी एक चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वाल्मीचे महासंचालक एच. के. गोसावी आदींची उपस्थिती होती.