शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘दशक्रिया’ चित्रपटाविरोधात ब्राह्मण समाजाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:37 IST

दशक्रिया’ या चित्रपटात ब्राह्मण समाजाविषयी अवमानकारक चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप करीत, ब्राह्मण समाज समन्वय समितीच्या वतीने १६ रोजी सकाळी क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘दशक्रिया’ या चित्रपटात ब्राह्मण समाजाविषयी अवमानकारक चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप करीत, ब्राह्मण समाज समन्वय समितीच्या वतीने १६ रोजी सकाळी क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.‘दशक्रिया चित्रपट प्रदर्शित करणाºया निर्माता व दिग्दर्शकाचा निषेध असो’, ‘चित्रपटाला परवानगी देणाºया सेन्सॉर बोर्डाचा धिक्कार असो’, ‘हिंदू संस्कृती टिकलीच पाहिजे, संस्कृतीचे रक्षण केलेच पाहिजे,’ ‘कायदा आहे सर्वांसाठी, कारवाई व्हावी समाजभेद करणाºयासाठी’, अशा घोषणा देत ब्राह्मण समाजाने निदर्शने केली. क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली सकाळी ११ वाजता निदर्शनाला सुरुवात झाली. या निदर्शनात समाजातील तरुण व ज्येष्ठ मंडळी तसेच तरुणी व महिलाही हिरीरीने सहभागी झाल्या होत्या. समन्वय समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर यांनी सांगितले की, दशक्रिया चित्रपटात ब्राह्मण समाजाची बदनामीकारक दृश्य व संवाद दाखविण्यात आले आहेत. ‘दशक्रिया विधी हा संस्कार ब्राह्मण समाज आणि पुरोहित यांनी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून सुरू केला आहे,’ अशा प्रकारचे अनेक अवमानकारक वाक्य व दृश्य चित्रपटात आहेत. देशात सर्वांना मत स्वातंत्र्य आहे; पण कोणत्याही समाजाचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. याचे भान निर्माता, दिग्दर्शकांनी ठेवणे आवश्यक आहे. कोणताही धर्म, समाज असो, त्याचा अवमान करणारा चित्रपट काढणाºयास सेन्सॉर बोर्ड परवानगी देते कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावेळी विजया कुलकर्णी, अंजली गोरे, वनिता पत्की, गीता आचार्य यांच्यासह सुरेश देशपांडे, अनिल खंडाळकर, आनंद तांदूळवाडीकर, मिलिंद दामोदरे, धनंजय पांडे, मंगेश पळसकर, संजय पांडे, मनोज पिंपळे, डॉ. संतोष सवई, प्रथमेश कुलकर्णी, सुधीर नाईक यांच्यासह समाजबांधव हजर होते. सायंकाळी बहुभाषिक ब्राह्मण संघटनेच्या वतीने गुलमंडीवर निदर्शने करण्यात आली. यात शहरातील पुरोहित सहभागी झाले होते.