शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

हवाई सेवेच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:47 IST

मराठवाड्याच्या हवाई उड्डाणाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे औरंगाबादला पर्यटन आणि उद्योग विकासाची नवनवीन दालने खुली झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत हवाई सेवेचा विकास अन् विस्ताराच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ बसली आहे. नवीन विमानसेवा सुरू होण्याऐवजी एक-एक विमान पडत आहेत. विमानतळाचे विस्तारीकरण, आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा, एअर अ‍ॅम्ब्युलन्स आदी सेवा कागदावरच आहेत.

ठळक मुद्देनवीन विमानसेवेची प्रतीक्षा : आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा, विस्तारीकरण, उडान योजना, एअर अ‍ॅम्ब्युलन्स कागदावरच

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हवाई उड्डाणाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे औरंगाबादला पर्यटन आणि उद्योग विकासाची नवनवीन दालने खुली झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत हवाई सेवेचा विकास अन् विस्ताराच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ बसली आहे. नवीन विमानसेवा सुरू होण्याऐवजी एक-एक विमान पडत आहेत. विमानतळाचे विस्तारीकरण, आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा, एअर अ‍ॅम्ब्युलन्स आदी सेवा कागदावरच आहेत.केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले. एअर इंडिया, ट्रूजेट आणि जेट एअरवेज कंपनीच्या विमानसेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले गेले. मात्र, आता जेट एअरवेजची सेवा बंद झाली. परिणामी केवळ दोन कंपन्यांचीच सेवा उरली.जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यास जगभरातून पर्यटक येतात. औरंगाबाद देशातील १८ विमानतळांच्या अंतर्गत आहे. ज्यात आशियाई देशांशी द्विपक्षीय करार आहे. औरंगाबाद विमानतळावरून श्रीलंका येथील पर्यटक अजिंठा, वेरूळ लेणीला भेट देतात. इतर देशातील पर्यटक पर्यटनासोबतच वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मेडिकल टुरिझमसाठी प्रयत्न हवेत. त्यासाठी विमानसेवेत वाढ होणे आवश्यक आहे. ‘उडान’ योजनेत समावेश होऊनही सेवा सुरू होत नाही.शहराच्या वाढणाºया विस्तारामुळे प्रवाशांची मागणी, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात होणारी विदेशी गुंतवणूक, त्यामुळे देश-विदेशातील उद्योगांसाठी आवश्यक असणारी विमानसेवा देण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे. विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी १८२ एकर जमिनीची मागणी प्राधिकरणाकडून सरकारकडे करण्यात आली. त्याला मान्यताही मिळाली. प्रत्यक्षात विस्तारीक रण रेंगाळलेले आहे.विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली. एका एजन्सीच्या माध्यमातून ही सेवा सुरू आहे. ही सेवा सुरू करताना पुढील तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू केली जाईल, असे जाहीर करण्यात आले; परंतु अजूनही ही सेवा कागदावरच आहे. जेट एअरवेज बंद झाल्यामुळे आता देशांतर्गत एअर कार्गो सेवाही फक्त एअर इंडियाच्या विमानांच्या भरवशावर सुरू आहे.जानेवारी २०१६ मध्ये शहरात पहिले अवयवदान झाले. त्यावेळी दाता असतानाही केवळ एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध नसल्यामुळे दात्याच्या हृदयाचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही. त्यानंतर मुंबईच्या एका कंपनीने एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. विमानतळावरून एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नलही मिळाल्या. तीन वर्षांत अनेकांचे अवयवदान झाले; परंतु अद्यापही शहरात एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवेची प्रतीक्षाच करावी लागत आहे.अजिंठा- वेरूळ हेलिकॉप्टर सेवामहाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना जोडून पर्यटन सर्किटमधील पर्यटकांना व विदेशी पर्यटकांना अजिंठा, वेरूळ, शिर्डी, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले व ऐतिहासिक स्थळांकडे आकर्षित करण्यावर भर देण्यात आला. त्यात औरंगाबाद-अजिंठा- वेरूळ हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येणार होती. परंतु ही सेवाही कागदावरच आहे.एकत्रित प्रयत्नांची गरजचिकलठाणा विमानतळाच्या क्षमतेच्या तुलनेपेक्षा कमी विमानसेवा सुरूआहे. आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा प्रलंबित आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी हवाई सेवा मागे पडत आहे. त्यासाठी औद्योगिक, पर्यटन संघटना, शासकीय अधिकारी यांनी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे.- आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआयएव्यवसायावर परिणामशिर्डी विमानतळामुळे औरंगाबादला येण्याऐवजी थेट शिर्डीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे औरंगाबादला विमानाने येणाºया प्रवासी संख्येत आधीच घट झाली आहे. त्यात आता जेट एअरवेजचे विमान बंद झाले. याचा सगळा पर्यटन, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.- विनोद पाटील, सचिव, औरंगाबाद टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स असोसिएशनप्राधिकरणाकडून प्रयत्नविमानतळ प्राधिकरणाकडून विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न, पाठपुरावा सुरू आहे. परंतु कंपन्यांकडे विमाने उपलब्ध नाहीत. त्यामुळे नवीन सेवा सुरू होत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कार्गो सेवाही सुरू होणे लांबणीवर पडत आहे.-डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ----------

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमान