शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शहर पोलीसचे दोन्ही संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:47 IST

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरूअसलेल्या १३ व्या व्हेरॉक करंडक औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब संघाने आयुर्विमा संघावर ४ गडी राखून मात केली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरूअसलेल्या १३ व्या व्हेरॉक करंडक औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब संघाने आयुर्विमा संघावर ४ गडी राखून मात केली. दुसºया लढतीत शहर पोलीस अ संघाने एमएसईडीसीएल संघावर ३६ धावांनी विजय मिळवला. इम्रान पटेल व राहुल जोनवाल हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.पहिल्या सामन्यात आयुर्विमा संघाने प्रथम फलंदाजी करताना १८ षटकांत सर्वबाद ९९ धावा केल्या. त्यांच्याकडून दिनेश नाकील याने ४१ चेंडूंत ३ चौकारांसह ३४, सुफियान अहमदने २१ आणि संजय भुसारे याने १२ धावा केल्या. २३ धावा त्यांना अवांतर धावांच्या रूपात मिळाल्या. शहर पोलीस ब संघाकडून इम्रान पटेल याने १८ धावांत ५ गडी बाद केले. अकबर शेख व राजू परचाके यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात शहर पोलीस ब संघाने विजयी लक्ष्य १४.१ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून इम्रान पटेलने २१ धावांत ४ चौकारांसह २६, मोहंमद आमेरने २४ चेंडूंत २ चौकारांसह २६ धावा केल्या. आयुर्विमा संघाकडून महेश रेड्डीने १७ धावांत २ तर सुफियान अहमद, संजय भुसारे व दिनेश नाकील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुपारच्या सत्रात एमएसडीसीएलविरुद्ध शहर पोलीसने २0 षटकांत ९ बाद १४0 धावा केल्या. त्यांच्याकडून सुदर्शन एखंडे याने २८ चेंडूंत १ षटकार व ३ चौकारांसह ३१, राहुल जोनवाल याने २९ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३७ व मोहंमद इम्रानने ३ चौकारांसह २१ धावा केल्या. एमएसडीसीएलकडून इनायत अली सय्यद याने २५ धावांत ३ गडी बाद केले. स्वप्नील चव्हाण, संजय बनकर, कैलास शेळके, पांडुरंग धांडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एमएसडीसीएल संघ १९.३ षटकांत १0४ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून स्वप्नील चव्हाणने ५ चौकारांसह ३७ व इनायत अली याने ५ चौकारांसह २४ व अकीब खानने २१ धावांचे योगदान दिले. शहर पोलीस अ संघाकडून मोहंमद इम्रानने १३ धावांत ३ गडी बाद केले. शेख असीफने २ तर राहुल जोनवाल, शेख जिलानी व शेख मुकीम यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.