शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय शिक्षणासाठी दोन्ही मुलांप्रमाणे पित्याची देहदानाची इच्छा राहिली अधुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:56 IST

नैसर्गिक मृत्यू, आजाराने मृत्यू, असे प्रमाणपत्र पाहिजे, तरच देहदान स्वीकारता येते.

ठळक मुद्दे मृत्यूनंतर देहदान टळलेदेहदान चळवळीतील कार्यकर्त्यांकडून हळहळ

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : दोन मुलांचे देहदान करणाऱ्या पित्याचीच गुरुवारी मृत्यूनंतर देहदानाची अखेरची इच्छा अपूर्ण राहिली. या पित्याने दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांचे देहदान केले होते. मुलांप्रमाणे आपलेही देहदान व्हावे, अशी त्यांची इच्छा होती; परंतु परिस्थितीमुळे त्यांचे देहदान टळले. याविषयी नातेवाईक आणि देहदान चळवळीसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

सोहनराज बोरा (७८, रा. युथ हॉस्टेल परिसर) असे या पित्याचे नाव आहे. त्यांचे गुरुवारी निवासस्थानी  निधन झाले. त्यांच्या छोट्या मुलाचे २०१७ आणि मोठ्या मुलाचे २०१८ मध्ये निधन झाले. तेव्हा वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने सोहनराज बोरा यांनी त्यांचे देहदान केले होते. मुलांप्रमाणे मृत्यूनंतर माझा देहही वैद्यकीय शिक्षणासाठी द्यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचे नातेवाईक दिलीप मुगदिया यांनी देहदानासाठी राजेशसिंह सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला. त्यानुसार सूर्यवंशी, प्रा. रवी पाटील, डॉ. मंगेश मोरे, प्रा. चंपालाल कहाटे यांनी घाटी आणि शहरातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांशी संपर्क केला. देहदानासाठी सर्व पातळीवरून प्रयत्न करण्यात आले; परंतु नैसर्गिक मृत्यू, मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याने देहदानास संमती मिळाली नाही. त्यामुळे अखेर त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.

नेत्रदानाची इच्छा पूर्णसूर्यवंशी म्हणाले, देहदानाला प्रोत्साहन देण्याची गरज असताना नकार देण्यात आला. दिलीप मुगदिया म्हणाले, अनेकांनी प्रयत्न करूनही त्यांच्या इच्छेप्रमाणे देहदान होऊ शकले नाही; परंतु किमान नेत्रदान झाले. 

आजार नमूद गरजेचेघरी मृत आढळले, असे कारण त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले होते. नैसर्गिक मृत्यू, आजाराने मृत्यू, असे प्रमाणपत्र पाहिजे, तरच देहदान स्वीकारता येते. सदर प्रमाणपत्र वरिष्ठांनाही दाखविले;  परंतु मृत्यूचे कारण नमूद नसल्याने देहदान  घेता आले नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतिमा कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :Organ donationअवयव दानAurangabadऔरंगाबाद