शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

बसमध्ये बॉम्ब; अफवेने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:17 IST

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले असताना पुण्याहून प्रवासी घेऊन शहरात येणा-या एस.टी. महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले असताना पुण्याहून प्रवासी घेऊन शहरात येणा-या एस.टी. महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच खळबळ उडाली.छावणीतील लोखंडी पुलावर बस अडवून कर्णपुरा येथील मैदानावर नेण्यात आली. बॉम्ब शोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथकाने बसमधील प्रत्येक प्रवाशासह बसची कसून तपासणी केली, तेव्हा बॉम्बची अफवाच असल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी कृषिमंत्री शरद पवार हे एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले असताना पुण्याहून शहरात दाखल होत असलेल्या शिवनेरी बसमध्ये (क्रमांक एमएच-६ एस ९३८७) बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला ३ वाजेच्या सुमारास प्राप्त झाला. या कॉलची माहिती पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि बीडीडीएसपथकाला देण्यात आली. छावणी पोलीस, वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी-कर्मचाºयांनी छावणीतील लोखंडी पुलावर शिवनेरी बस अडविली आणि बसचालकास गाडी थेट कर्णपुरा येथील मोकळ्या जागेत उभी करण्याचे सांगितले. यानंतर पोलिसांच्या मोठ्या ताफ्याने बसला घेराव घातला. प्रथम सर्व प्रवाशांना बसमधून उतरवून त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर बीडीडीएसचा स्फोटक शोधक श्वान आणि मेटल डिटेक्टरने बसची कसून तपासणी करण्यात आली.प्रवाशांचे सर्व सामान आणि पार्सलची तपासणी करण्यात आली. या तपासणीत बसमध्ये कोणतीही आक्षेपार्ह आणि संशयास्पद वस्तू न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा सुसकारा सोडला. कुणीतरी खोडसाळपणा केल्याचे नंतर स्पष्ट झाले. मात्र कर्णपुरा मैदानावरील हा प्रकार पाहून नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली.बसस्थानकावरील बसेसची तपासणीकर्णपुरा येथे बसच्या तपासणीत काहीही नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक येथे जाऊन अन्य शिवनेरी आणि अश्वमेध बसेसची तपासणी सुरू केली. शिवाय साध्या वेशातील अधिकारी बसस्थानकावरील संशयास्पद वस्तू आणि व्यक्तींवर नजर ठेवून होते.