शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोगस नोकर भरती; दोषींवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:45 IST

महापालिकेत २०१०-१४ या पाच वर्षांमध्ये लाड समितीच्या माध्यमाने तब्बल १८८ सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले. या सर्व नेमणुका नियम धाब्यावर बसवून करण्यात आल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेत २०१०-१४ या पाच वर्षांमध्ये लाड समितीच्या माध्यमाने तब्बल १८८ सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले. या सर्व नेमणुका नियम धाब्यावर बसवून करण्यात आल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे. या प्रकरणात शासनाने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक तुकाराम मुंढे यांच्याकडून बोगस नोकरभरतीची चौकशी करण्यात आली. मुंढे यांनी आपला अहवाल शासनाला सादर केला. त्यानंतर शासनाने लगेच महापालिकेतील दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले. त्यामुळे मनपातील अधिकाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.महापालिकेत काम करणारा एखादा सफाई मजूर निवृत्त झाल्यास त्याच्या जागेवर त्याच्या रक्तातील नातलगाला तो आपल्या जागेवर नोकरीवर लावू शकतो. दत्तक घेतलेल्या मुलालाही नोकरीवर लावण्याची मुभा आहे. लाड समितीमार्फत ही सर्व भरती करण्यात येते. समितीअंतर्गत सफाई मजुरांसाठी कायदे अत्यंत सोयीचे केले आहेत. याच कायद्याचा गैरफायदा घेत महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाºयांनी २०१०-१४ या पाच वर्षांत १८८ कर्मचाºयांची बोगस भरती केली. या बोगस नोकरी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. २०१५ मध्ये विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित झाला. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. शासनाने नवी मुंबईचे तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून चौकशी करण्याचा निर्णय घेतला. नंतर मुंढे यांची पुण्याला महानगर परिवहन महामंडळाच्या संचालकपदी बदली झाली. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मुंढे यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी औरंगाबादेत येऊन सखोल चौकशीही केली. भरतीसंदर्भातील कागदपत्रेही ते पुण्यालाही घेऊन गेले होते.