शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जि़प़तील बोगस आदेश प्रकरणाचे धागेदोरे सापडले

By admin | Updated: September 11, 2014 00:41 IST

चौकशीत आता पदाधिकाऱ्यांच्या ‘स्वीय’ सहायकांचा सहभागही पुढे आला आहे़

नांदेड : आंतरजिल्हा बदल्यांसह जिल्हांतर्गत बदल्यांचा वर्षभर बाजार मांडल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीत आता पदाधिकाऱ्यांच्या ‘स्वीय’ सहायकांचा सहभागही पुढे आला आहे़ जिल्हा परिषदेत बदल्यांचे बोगस आदेश काढल्याचे प्रकरण विठ्ठल जमजाळ या शिक्षकाच्या जिल्हांतर्गत बदलीतून उघडकीस आले़ मुखेड गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संशय आल्याने जमजाळ या शिक्षकास रूजू करून घेण्यास नकार दिला़ चौकशीअंती हा आदेश बोगस असल्याची बाब उघडकीस आली़ चौकशीदरम्यान एकाच आऊटवर्ड क्रमांकाद्वारे बदल्यांचे तब्बल ७ आदेश नेल्यानंतर त्याच क्रमांकाच्या आधारे बोगस आदेश तयार केल्याची बाबही पुढे येत आहे़ यातील दोन संशयित बदलीचे प्रकरणे चौकशीत बाहेर आली आहेत़ संबंधितांनी या प्रकारामागे कोण आहे याची इत्यंभूत माहिती चौकशी अधिकाऱ्यांपुढे सादर केली आहे़ त्यातून या प्रकाराचे गांभीर्य वाढतच चालले आहे़ बहुचर्चित आऊटवर्ड क्रमांक १४७६ द्वारे ७ बदल्या करण्यात आल्या होत्या़ त्यात किनवट, हिमायतनगर, लोहा, मुखेड, बिलोली , भोकर आणि धर्माबाद येथील होत्या़ सदर आदेश हे शिक्षणाधिकारी मडावी यांच्या सहीनिशी होते़ त्या प्रकरणाच्या संचिकाही आहेत़ मात्र या सात संचिका वगळता अन्य संशयित बदल्यांसाठीही १४७६ हाच आऊटवर्ड क्रमांक दिला आहे़ शिक्षण विभागातील आऊटवर्ड रजिस्टरवर आदेश नेणाऱ्या एका पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायकाचे नाव नमूद करण्यात आले आहे़ उपरोक्त सात आदेशाची नक्कल करीत बनावट सही शिक्क्यांचा वापर करून बदलीच्या ठिकाणचे आदेश बजावण्यात आले आहे़ मात्र सेवेतील अधिकाऱ्यांना खरे व बोगस आदेश लगेच लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचे बिंग बाहेर आले आहे़ संशयित आदेश असलेल्या विठ्ठल किशनराव जमजाळ हे मुखेड तालुक्यात रूजू होण्यासाठी गेले होते़ त्यांना रूजू करून घेतले नाही़ त्यांना हे आदेश मुखेड तालुक्यातील सावरगाव येथील एका सहशिक्षकाने दिल्याचे चौकशीत पुढे आले आहे़ याच प्रकरणाच्या चौकशीत संशयित आदेश असलेले जी़ए़ पांचाळ हे तर हदगाव तालुक्यातून देगलूर तालुक्यातील करडखेड येथे रूजूही झाले आहेत़ त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते़ त्यांनी तर आपल्याला जि़प़ परिसरात एका पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायकाकडून बदलीचे आदेश दिले होते, असे स्पष्टपणे नमूद केले आहे़ संचिका असलेल्या बदल्यांचे आदेश हे सुस्पष्ट व एका विशिष्ट नमुन्यात आहेत़ तर संशयित आदेश हे चार ओळीचे व केवळ एका संदर्भीय पत्राचा उल्लेख करीत दिले गेले आहेत़ चौकशीत अनेक संशयित पुढे येत आहेत़ त्यांच्यावर कारवाई होणार की शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळणार, हा प्रश्न पुढे येत आहे़ (प्रतिनिधी)