शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा मृतदेह दरीत आढळला

By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST

बनोटी/घाटनांद्रा : सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथून बेपत्ता झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह खून झालेल्या अवस्थेत घाटनांद्रा -पाचोरा रस्त्यावरील खोल दरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबनोटी/घाटनांद्रा : सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथून बेपत्ता झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह खून झालेल्या अवस्थेत घाटनांद्रा -पाचोरा रस्त्यावरील खोल दरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.सीमा रामा राठोड (१५, रा. हनुमंतखेडा) असे मृत मुलीचे नाव आहे. ती हनुमंतखेडा येथील स्व. स्वातंत्र्यसैनिक सरिचंद राठोड विद्यालयातील इयत्ता दहावीत शिक्षण घेते. शुक्रवारी आई मजुरी करण्यासाठी व वडील शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. त्यामुळे शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर आईला मदत म्हणून आपण स्वयंपाक करुन ठेवू म्हणून तिने भाकरी टाकण्यासाठी पिठाचा डबा काढला व माठात पाणी घेण्यासाठी गेली पण माठ कोरडा होता. त्यामुळेपीठ झाकून सीमा पाणी आणण्यासाठी गावाजवळील विहिरीवर गेली. गावात पाईपलाईनचे काम सुरू असल्याने तीन चार दिवसांपासून नळाला पाणी आलेले नव्हते. सीमा पाणी घेऊन परत आली नाही म्हणून आई वडीलांनी व गावातील मंडळींनी सीमाचा शोध घेतला. नातेवाईकांना फोन करुन विचारले पण रात्री उशिरापर्यंत तपास लागला नाही. म्हणून शनिवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली. याबाबत बनोटी दुरक्षेत्रात तक्रार दाखल करण्यासाठी गावकरी गेले, तेव्हा पोलीस शिपाई योगेश झाल्टे यांना दूरध्वनी आला की घाटनांद्रा घाटात एका मुलीचा मृतदेह पडलेला आहे. यावरुन गावातील नागरिक व नातेवाईकांनी तिकडे धाव घेतली. दरीत पडलेला मृतदेह सीमाचाच असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली. सीमाला दगडाने ठेचून मारण्यात आले असून तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सिल्लोडचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे व सोयगावचे पोलीस निरीक्षक सुजित बडे पुढील तपास करीत आहेत.