शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:44 IST

तीन महिन्यांपूर्वी एका प्रेमप्रकरणावरुन झालेल्या वादानंतर दत्तनगर येथील ओमकार प्रभाकर अल्लाकोंडे (वय २३) या तरुणाचा त्याच्याच तीन मित्रांनी चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उजेडात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: तीन महिन्यांपूर्वी एका प्रेमप्रकरणावरुन झालेल्या वादानंतर दत्तनगर येथील ओमकार प्रभाकर अल्लाकोंडे (वय २३) या तरुणाचा त्याच्याच तीन मित्रांनी चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उजेडात आली़ याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़ओमकार अल्लाकोंडे हा तरुण रेल्वेस्थानक परिसरातील बाळू पवार यांच्या हेअर कटिंग सलूनमध्ये काम करीत होता़ त्याचवेळी त्याची ओळख प्रवीण लोका या तरुणाशी झाली़ मंगळवारी सकाळी ओमकार हा सकाळपासून त्याचा भाऊ वाहनचालक शैलेश अल्लाकोंडे याच्याबरोबर चारचाकी वाहनाच्या पासिंगसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात होता़ दुपारी दोन वाजेच्या सुमारास ओमकार घराकडे निघाला होता़, परंतु रात्री साडेआठ वाजेपर्यंत तो घरी न आल्यामुळे ओमकारचा भाऊ शैलेश याने त्याचा शोध सुरु केला़ अण्णाभाऊ साठे चौकात शैलेशला ओमकारचा मित्र प्रवीण लोका भेटला़यावेळी लोका याने ओमकारचे मित्र नरेश, अशोक व अन्य एक असे तिघे जण त्याला घेवून बोलण्यासाठी दुचाकीवर बसवून घेवून गेल्याचे सांगितले़ तसेच ओमकार व नंदीग्राम सोसायटीमधील नरेश या मुलाचा तीन महिन्यांपूर्वी एका मुलीवरुन वाद झाल्याचेही लोका यांनी शैलेश अल्लाकोंडे यांना सांगितले़ त्यानंतर शैलेश याने ओमकारला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़, परंतु त्याचा फोन बंद येत होता़ त्यानंतर शैलेश याने रेल्वेस्थानक परिसरात शोध घेतला असता फटाका मार्केटच्या मोकळ्या मैदानावर ओमकारचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले़ओमकारच्या पोटावर, छातीवर व हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून केला होता़ याप्रकरणी शैलेश अल्लाकोंडे यांच्या तक्रारीवरुन नरेश, अशोक व अन्य एका जणाविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला़