शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जालना रोडवर महिलेचा भोसकून खून

By admin | Updated: February 18, 2016 00:09 IST

करमाड : आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेला कुंभेफळ शिवारात गजबजलेल्या जालना रोडलगत चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला.

करमाड : आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेला कुंभेफळ शिवारात गजबजलेल्या जालना रोडलगत चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. सुनीता प्रकाश चौघुले (४०, रा. एन-२, ठाकरेनगर) असे तिचे नाव आहे. हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला की, इतर काही कारणाने हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भर रस्त्यालगत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनीता चौघुले यांचे छोटे भाऊ मधुकर शिरसाठ हे कुंभेफळ शिवारात जालना रोडलगत असलेल्या माऊलीनगरात राहतात. शिरसाठ हे आपल्या मूळ गावी वडिलांना भेटण्यासाठी गेलेले होते. गावाहून परतत असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांना बहीण सुनीताने फोन केला आणि ‘आज मी तुम्हाला भेटायला येते’ असे म्हणाली. तेव्हा शिरसाठ यांनी मी बसने सायंकाळी कुंभेफळला पोहोचले, असे सांगितले. त्यावर सुनीताने मग जालना रोडवरील केम्ब्रिज चौकात उतरल्यानंतर मला फोन करा, असे म्हटले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास केम्ब्रिजजवळ उतरल्यानंतर त्यांनी बहिणीला फोन केला; परंतु फोनवर आवाज नीट येत नसल्याने दोघांमध्ये बोलणे होऊ शकले नाही. मग शिरसाठ सरळ घरी निघून आले. घरापासून काही अंतरावरच...बहीण येणार असल्याने घरी स्वयंपाकाची तयारी करीत शिरसाठ बसले होते. तोच साडेसात वाजेच्या सुमारास बाहेर आरडाओरड सुरू असल्याचा आवाज शिरसाठ कुटुंबाच्या कानावर पडला. काय झाले हे पाहण्यासाठी कुटुंब बाहेर आले. तेव्हा घरापासून सुमारे ३०० फूट अंतरावर माऊलीनगरकडून कुंभेफळ कमानीकडे जाणाऱ्या रोडवर काही लोक जमलेले असल्याचे नजरेस पडले. त्यामुळे पाहण्यासाठी हे कुटुंबही तेथे गेले. तेथे पोहोचताच त्यांना धक्काच बसला. कारण गर्दीत खाली रक्ताच्या थारोळ्यात शिरसाठ यांची बहीण सुनीता गंभीर जखमी अवस्थेत पडलेली असल्याचे दिसले. ती कुंभेफळ कमानीकडे जाणाऱ्या रोडच्या दिशेने बोट दाखवून काही तरी सांगण्याचा प्रयत्न करीत होती; परंतु तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. बरगडीत धारदार शस्त्राने तिला भोसकण्यात आलेले असल्याचे नजरेस पडताच शिरसाठ यांनी शेजारांच्या मदतीने तिला जीपमध्ये टाकून घाटीत उपचारासाठी आणले. उपचार सुरू असताना रात्री तिचा मृत्यू झाला.