लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : सामाईक आंब्याच्या झाडाचे आंबे का तोडले म्हणून चुलत्यासह इतरांनी पुतण्यास जबर मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गुरुवारी घनसावंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस सुत्रांनी सांगितले, की घनसावंगी तालुक्यातील पाडुळी खु. येथील शिवाजी देविदास गवारे, केशव शिवाजी गवारे, सविता शिवाजी गवारे यांनी समाईक अंब्याचे आंबे का तोडले म्हणून पुतण्या विठ्ठल गणेश गवारे (२८) यास सोमवारी सकाळी लोखंडी रॉडने जबरी मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी विठ्ठलवर औरंगाबादमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.दरम्यान, या प्रकरणी मृत विठ्ठल गवारे याची आई सरस्वती गणेश गवारे यांच्या फिर्यादीवरून वरील संशयितांविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबे तोडल्यामुळे पुतण्याचा खून
By admin | Updated: June 2, 2017 00:38 IST