लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : देगलूर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांचा अप्रत्यक्ष सहभाग दिसून आल्याचा निष्कर्ष या प्रकरणाचे चौकशी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांनी काढला असून तसा अहवाल कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मधुकर नारलावार, कार्याध्यक्ष व नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लक्ष्मीकांत पद्मवार यांनी तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील (सध्या हिंगोली) यांच्या निवडणुकीतील सहभागाबद्दल जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली होती. तत्कालीन नगराध्यक्षा उज्ज्वला पद्मवार व मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यातील विसंवादामुळे जिल्हाधिकाºयांकडे दोघांच्याही परस्परविरोधी तक्रारी झाल्या. ९ जून २०१६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीनंतर रामदास पाटील यांची हिंगोली येथे बदली करण्यात आली.१९ डिसेंबर रोजी मतमोजणी पूर्ण होऊन निकाल लागल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिरशेटवार, प्रभाग क्र. ७ मधील निर्वाचित नगरसेवक बालाजी टेकाळे यांचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी स्वागत केलेले तसेच त्यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये नृत्य केलेली छायाचित्रे व व्हिडीओ क्लिप तसेच त्यांनी सोशल मीडियावरील केलेल्या सर्व पोस्टचे पुरावे दाखल करण्यात आले होते. जिल्हाधिकाºयांच्या निर्देेशानुसार उपजिल्हाधिकाºयांसमक्ष मार्च महिन्यात या प्रकरणाची सुनावणी झाली. रामदास पाटील यांनी हजर होऊन आपले म्हणणे मांडले. पद्मवार यांच्याशी संबंधित पाटील यांनी ज्या ग्रूपवर अथवा व्यक्तिगत चॅटिंग केले त्यापैकी सूर्यकांत पत्तेवार, लालू कोयलावार, मधुकर नारलावार, पांडुरंग थडके यांचे शपथपत्र व म्हणणे, दाखल पुरावे तसेच निवडणूक काळातील त्यांचे वास्तव्य यावरून पाटील पालिका निवडणुकीत अप्रत्यक्ष सहभागी झाल्याचे व नागरी सेवा (वर्तणूक) यांचा भंग केल्याचा निष्कर्ष उपजिल्हाधिकाºयांनी काढला असून तसा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविला. जिल्हाधिकारी आता याप्रकरणी काय कार्यवाही करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्कालीन सीईओंवर ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:46 IST