शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसंबंधाचे चित्रीकरण केलेल्या टोळीकडून ब्लॅकमेलिंग; त्रासाने युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 12:27 IST

ब्लॅकमेल करून ४६ हजार रुपये उकळले. परंतु त्यांचे त्यावर समाधान झाले नाही आणि पुन्हा ३ लाख रुपयांची मागणी केली.

ठळक मुद्देया प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली

करमाड ( औरंगाबाद ) : शरीरसंबंधाचे चित्रीकरण करून पैसे उकळणे तसेच सततच्या ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून कुंभेफळच्या युवकाने अखेर आत्महत्या केली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

जितेंद्र सिंग बाबूलाल सिंग असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी सिंग याने विषारी बिया खाल्ल्याने त्यास शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. करमाड पोलिसांनी घेतलेल्या जबाबात त्याने म्हटले की, अरुण सूर्यवंशी व अन्य त्याचा दुसरा मित्र दिलीप जाधव या दोघांनी मुलगी शरीरसंबंधासाठी उपलब्ध करून देतो, असे सांगून त्या मुलीशी शरीरसंबंध करतानाचे फोटो व व्हिडिओ काढून त्याबद्दल त्याला ब्लॅकमेल करून ४६ हजार रुपये उकळले. परंतु त्यांचे त्यावर समाधान झाले नाही, तर पुन्हा ३ लाख रुपयांची मागणी केली. त्रासाला कंटाळून सिंग याने आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री उपचारादरम्यान खाजगी दवाखान्यात सिंगचा मृत्यू झाला. कटात सहभागी योगेश नाडे (रा. औरंगाबाद) व इतर साथीदार यांच्या साहाय्याने प्लॅन करून याबाबत व्हिडिओ शूटिंग करून खंडणी मागण्याचा प्रकार निष्पन्न झाला. गुन्ह्यात तिघांनाही उपनिरीक्षक नागलोत, पोहेकॉ संतोष पाटील, पोलीस नाईक अनिल गायकवाड, संदीप जाधव, आनंद घाटेश्वर, एन. धोंडकर यांच्या पथकाने अटक केली.

टोळीने किती जणांना फसविले...या टोळीने अशा प्रकारे किती जणांना फसवून खंडणी वसूल केली, या प्रकरणी करमाड पोलीस शोध घेत असून, गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक नागलोत करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी