शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

अपघातासाठी प्रसिद्ध ‘ब्लॅक स्पॉट’चे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:32 IST

औरंगाबाद-अहमदनगर व मुंबई-नागपूर महामार्गावर अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘ब्लॅक स्पॉट’चे आज सोमवारी सर्वेक्षण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : औरंगाबाद-अहमदनगर व मुंबई-नागपूर महामार्गावर अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘ब्लॅक स्पॉट’चे आज सोमवारी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात आरटीओ, जागतिक बँक प्रकल्प व वाहतूक शाखेच्या अधिकाºयांनी पुढाकार घेऊन या अपघात स्थळांची पाहणी केली. या धोकादायक ‘ब्लॅक स्पॉट’ची यादी तयार करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.वाहतूक शाखेच्या वाळूज विभागांतर्गत मुंबई-नागपूर व औरंगाबाद-नगर या दोन महामार्गाचा समावेश आहे. या दोन्ही महामार्गांवर दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरूअसते. या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहनधारकांना या महामार्गावरून कसरत करीत ये-जा करावी लागते. याशिवाय महामार्गावर रस्त्याच्या कडेला अनेक वाहनधारक वाहने उभी करीत असल्यामुळे रस्ता अरुंद बनला असून, वाहतुकीच्या कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो.या महामार्गावर विविध व्यावसायिकांचे अतिक्रमण, पार्किंगचा अभाव, दुभाजकांची दुरवस्था, धोकादायक पद्धतीने उभारलेले गतिरोधक आदींमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या दोन्ही महामार्गांवर अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या या ‘ब्लॅक स्पॉट’वर सतत प्राणांतिक, गंभीर अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या मार्गावर झालेल्या अनेक भीषण अपघातात अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक मनोज पगारे यांना आदेश बजावून उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, आरटीओ यांना सोबत घेऊन या ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करण्याचे आदेश बजावले होते.पथकाकडून सर्वेक्षणआज सोमवारी वाहतूक शाखेचे निरीक्षक मनोज पगारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता चव्हाण, जागतिक बँक प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता कानडे,आरटीओचे यादव, काळे, वाहतूक शाखेचे पोकॉ. रामेश्वर कवडे, शेख हबीब, शमशू सिद्दीकी, कुंटेवार, खरात, मादगरकर, स्वामी आदींच्या पथकाने औरंगाबाद-नगर व मुंबई- नागपूर महामार्गावरील अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळांना भेटी देऊन पाहणी केली.