लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:फोडाफोडीच्या राजकारणाने भाजपा मोठी झाली आहे़ मुळात भाजपाकडे स्थानिक पातळीवर खंबीर नेतृत्वच नाही़ त्यामुळे प्रत्येक निवडणुकी अगोदर दुसºयाच्या घरात वाकुन पाहणे त्यांचा सवयीचा भाग असल्याचा टोला शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी लगाविला़स्थानिक आमदाराच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत तीनच दिवसापूर्वी अनेक नगरसेवक, पदाधिकाºयांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपाचे कमळ हाती धरले आहे़ त्यात मुंबई येथे झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीनंतर संपर्कप्रमुख आनंद जाधव हे शनिवारी नांदेडात आले होते़ यावेळी त्यांनी शहरात प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची भेटी घेतल्या़ त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी सेना सोडून गेलेल्यांचा खरपूस समाचार घेतला़ ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून नांदेडचे राजकारण ढवळून निघाले आहे़ शंभर कावळ्यांना मुठभर मावळे जमिनीत गाडतील असे म्हणत त्यांनी पळपुट्यांना जनताच धडा शिकवेल असा टोला लगाविला़ तर आ़हेमंत पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी आमिषाला बळी पडू नये़ ज्यांनी सेना सोडली त्यांची अवस्था काय झाली? हे सर्वांनी जवळून पाहिले आहे़ यावेळी भूजंग पाटील, समन्वयक धोंडू पाटील, सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, डॉ़मनोजराज भंडारी, प्रकाश मारावार उपस्थित होते़
दुसºयांच्या घरात वाकून पाहण्याची भाजपची सवय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:43 IST