दिलेल्या निवेदनात नमूद केले की, हा लॉकडाऊन व्यापारी वर्गावर अन्याय करणारा आहे. वर्षभरापासून कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे अर्थचक्र विस्कळीत झालेले आहे. वर्षभरातील बंद काळात बँकेचे हफ्ते त्यावरील व्याज, लाइट बिल, दुकान भाडे, अनेक प्रकारचा टॅक्स, नोकर वर्गाचा पगार हा बंद काळातसुद्धा भरावा लागत आहे. बँका कर्जवसुलीसाठी नोटिसा पाठवीत आहे. महावितरण वीज कनेक्शन कट करत आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग
आधीच कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन दोन दिवसांत मागे घ्यावा, अन्यथा व्यापारी आपले दुकाने उघडतील, असा इशारा भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद मंडलेचा यांनी दिला आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, मराठवाडा संघटक मुकेश जैन, चिटणीस संदीप मुथा, हडको मंडळाचे राजू पळसकर, राजू अंदुरे, रोहित दाभाडे, कमलेश कस्तुरे हजर होते.
फोटो : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देताना भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद मंडलेचा, मुकेश जैन आदी.
080421\img_20210408_162313_437_1.jpg
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताडे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद मंडलेचा, मुकेश जैन आदी.