शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेनेच्या वॉर्डांत ‘ट्रॅक्टर’ चा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:20 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना नगरसेवक असलेल्या वॉर्डांत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव (निशाणी ट्रॅक्टर) यांनी जोरदार मते घेतल्याची माहिती मतदान केंद्रनिहाय आकडेवारीवरून समोर येऊ लागली आहे.

ठळक मुद्देराजकारण: मतदान केंद्रनिहाय आकडेवारीच्या आधारे होणार फेरबदल

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना नगरसेवक असलेल्या वॉर्डांत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव (निशाणी ट्रॅक्टर) यांनी जोरदार मते घेतल्याची माहिती मतदान केंद्रनिहाय आकडेवारीवरून समोर येऊ लागली आहे.खुल्या प्रवर्गातील वॉर्डांत ‘ट्रॅक्टर’ने अक्षरश: धुमाकूळ घातल्यामुळे शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचा आरोप पक्षांतर्गत बैठकांमध्ये होऊ लागला आहे. वॉर्डनिहाय मतदानाच्या आकडेवारीवरून शिवसेनेत मोठे फेरबदल होणे निश्चित असल्याचे मानले जात असून, भाजप पूर्व मतदारसंघातील एमआयएम आणि अपक्ष उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे चिंतेत आहे. भाजप आणि शिवसेना नगरसेवकांच्या वॉर्डातून जाधव यांना मतदान झाले. एन- ५, एन- ६, जयभवानीनगर, विश्रांतीनगर, एन- १, एन- २ ठाकरेनगर, पुंडलिकनगर, मेहरनगर, भारतनगर, गजानननगर या भागातूनही अपक्ष उमेदवाराला चांगली मते मिळाली आहेत.मध्य मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत युती उमेदवाराचा निभाव लागेल की नाही, हे सांगणे अवघड आहे. मध्य मतदारसंघातील सुरेवाडी, मयूर पार्क, हर्सूल, पवननगर, हडको, एन-८ या भागातून, तर पश्चिम मतदारसंघातील शिवाजीनगर, वाळूज-पंढरपूर, सातारा-देवळाई, बजाजनगर, वडगाव कोल्हाटी, उल्कानगरी, वेदांतनगर परिसरातून अपक्ष उमेदवाराला मतदान झाले आहे.जाधव यांना पूर्व मतदारसंघातून २५ हजार ६१९, पश्चिम मतदारसंघातून ३८ हजार ५७, तर मध्य मतदारसंघातून ३० हजार २१० अशी ९३ हजार ८८६ मते मिळाली आहेत. खैरेंना तिन्ही मतदारसंघांतून १ लाख ८३ हजार १८ मते मिळाली. पूर्वमध्ये शिवसेनेचे व सहयोगींसह १२ नगरसेवक आहेत. पश्चिम मतदारसंघात १३ तर मध्यमध्ये १० नगरसेवक आहेत. भाजपच्या पश्चिम मतदारसंघात सहयोगी नगरसेवकांसह ७ जण आहेत. मध्यमध्ये ९ तर पूर्व मतदारसंघात भाजपचे १० नगरसेवक आहेत. भाजपच्या चिन्हावर आलेल्या आणि पुरस्कृत नगरसेवकांच्या वॉर्डातून अपक्ष उमेदवाराला मतदान चांगले झाले आहे, तसेच शिवसेनेच्या वॉर्डातूनही ट्रॅक्टरने अनपेक्षित मतदान घेतले आहे.मतदान केंद्रनिहाय चाळणीजिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी केंद्र नावानिशी देण्याऐवजी केंद्र क्रमांकाने दिली आहे. शिवसेनेला भाजप नगरसेवकांच्या वॉर्डातून किती मतदान मिळाले, अपक्ष उमेदवाराला किती मतदान झाले. याची चाळणी सुरू आहे. तिन्ही विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी केंद्र आणि नावांची जुळणी करून मतदानाची गोळाबेरीज करीत आहेत. शिवसेना,भाजपच्या वॉर्डातून अपक्ष उमेदवाराला मिळालेले मतदान पाहून सर्वांचे डोळे चक्रावत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv Senaशिवसेना