शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपवाले दंगल संपल्यानंतर हजर झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:20 IST

ले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एका महिलेकडून दंगलीचा आढावा घेतला. तेव्हा त्यांना शिवसैनिकांनी शहर वाचविल्याचे त्या महिलेने सांगितले. यानंतर जोशी यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना झापल्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ११ व १२ मे रोजी झालेल्या दंगलीमध्ये हिंदूंना वाचविण्याचे काम शिवसैनिकांनी केले. शनिवारी सकाळी पोलिसांची अधिक कुमक दाखल झाल्यानंतर भाजपचे आमदार अतुल सावे घटनास्थळी आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एका महिलेकडून दंगलीचा आढावा घेतला. तेव्हा त्यांना शिवसैनिकांनी शहर वाचविल्याचे त्या महिलेने सांगितले. यानंतर जोशी यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना झापल्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांनी केला.शिवसेनेतर्फे तापडिया नाट्यमंदिर येथे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन बुधवारी (दि.१६) केले होते. त्यात बोलताना खा. खैरे यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाट, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.यावेळी खा. खैरे म्हणाले, शहरातील दंगलीसंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आरोप करीत आहेत. मुळात हेच विखे मुख्यमंत्र्यांशी मिळालेले आहेत. त्यांच्या आरोपांकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. भाजप महापालिकेत, राज्यात सत्तेत आहे. तरीही त्यांचे शहरातील कचरा, पाणीप्रश्नी कोणीही नाव घेत नाही. उलट हे भाजपवालेच शिवसेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप खा. खैरे यांनी केला.शहरातील हिंदू नागरिकांचे रक्षण करण्यास शिवसेना हा एकमेव पक्ष सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केला. विनोद घोसाळकर म्हणाले, शिवसेना स्वबळावर लढणार असल्यामुळे शाखाप्रमुखांनी आताच कामाला लागावे. ज्यांना काम करायचे आहे त्यांनीच स्वत:कडे पदे ठेवावीत. अन्यथा पदे सोडून देऊन दुसऱ्यांना काम करण्याची संधी देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आ. शिरसाट, नरेंद्र त्रिवेदी, प्रदीप जैस्वाल आदींनी मनोगत व्यक्त केले.जंजाळने माझ्या पुतण्याला वाचवलेदंगलीमध्ये एका जैन महिलेला वाचविण्यासाठी माझा पुतण्या सचिन खैरे, प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वाल, लच्छू पहिलवानचा मुलगा गेले होते. त्या घरावर दगडफेक करण्यात येत होती. या महिलेसह चौघांना वाचविण्यासाठी राजू जंजाळने हवेत काय करायचे ते केले. (यावेळी गोळीबाराचा उल्लेख टाळत बोटाने इशारा केला.) राजूने असे केले नसते तर त्या चौघांचा बळी गेला असता, असा दावाही खा. खैरे यांनी केला.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार