शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेला उदंड प्रतिसाद

By admin | Updated: July 27, 2015 01:12 IST

बीड : ‘लोकमत कॅम्पस क्लब’ आयोजित सुंदर इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेला रविवारी उदंड प्रतिसाद मिळाला. शहरातील ज्ञानेश्वर नगर भागातील तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत

 

बीड : ‘लोकमत कॅम्पस क्लब’ आयोजित सुंदर इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेला रविवारी उदंड प्रतिसाद मिळाला. शहरातील ज्ञानेश्वर नगर भागातील तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत विविध शाळांमधील ६१९ विद्यार्थी सहभागी झाले होते. चार गटांमध्ये पार पडलेल्या स्पर्धेचा लगेचच निकाल जाहीर करुन विजेत्यांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘लोकमत’ने कॅम्पस क्लब हा अभिनव उपक्रम आणला आहे. याअंतर्गत चालू शैक्षणिक वर्षामध्ये सदस्य झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या पहिल्याच कार्यक्रमाला विद्यार्थी, पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत स्पर्धा झाल्या. पहिली ते दुसरी, तिसरी ते पाचवी, सहावी ते सातवी, आठवी ते दहावी अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक म्हणून विकास साळूंके (औरंगाबाद), मीना नाईक (बीड) यांनी काम पाहिले. ‘तुलसी’चे संस्थाप्रमुख प्रा. प्रदीप रोडे, मुख्याध्यापक सुशीलकुमार जाधव, विजेंद्र सरकटे, व गायकवाड यांचे सहकार्य लाभले. गटनिहाय विजेतेपहिली ते दुसरी : स्तूती बनसोडे (सेंट अ‍ॅन्स स्कूल)-प्रथम, मंथन कुलकर्णी (श्री श्री रविशंकर स्कूल)- द्वितीय, जय जोगदंड (किडझी् स्कूल) - तृतीयतिसरी ते पाचवी : निकूंज हरकूट (सेंट अ‍ॅन्स स्कूल)- प्रथम, रोहित टेपले (चंपावती इंग्लिश स्कूल) - द्वितीय, मुक्ता वेदपाठक ( नूतन इंग्लिश स्कूल)- तृतीयसहावी ते सातवी : यशराज तावरे (गुरुकुल इंग्लिश स्कूल)- प्रथम, प्रांजल साबळे (तुलसी इंग्लिश स्कूल) - द्वितीय, प्रांजल इरंडे (संस्कार विद्यालय)- तृतीयआठवी ते दहावी : क्रांती राऊत (ग्रामीण मा. विद्यालय नेकनूर)- प्रथम, अरविंद क्षीरसागर (गुरुकुल इंग्लिश स्कूल) - द्वितीय, खतीब झिशान अफझालूद्दीन (मिलीया मुलांचे इंग्लिश स्कूल) - तृतीय (प्रतिनिधी)