लोकमत न्यूज नेटवर्कआडगाव रंजेबुवा : वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथे रविवारी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने दोन बालकासह व वृद्धाला चावा घेतला. त्यामुळे गावात या कुत्र्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आडगाव रंजेबुवा येथे रविवारी सकाळच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने उत्तमराव गरूड (५५), अभिषेक विष्णू खराटे (५), अनुराधा बाळू चव्हाण (४) या तिघांना चावा घेतल्याने त्यांना उपचारासाठी परभणी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या लहान बालकांना गंभीर जखमी केल्यामुळे परभणी येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत आहेत.
पिसाळलेल्या कुत्र्याचा तिघांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:41 IST